आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • By The Time Players Have To Learn To Adapt To The Changing Mechanism That Changes Satpal Singh

काळानुरूप बदलणारे तंत्र खेळाडूंनी आत्मसात करावे -सतपाल सिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- कुस्तीमध्ये भारताची परंपरा उल्लेखनीय आहे. परंतु, बदलत्या काळाप्रमाणे जगातील बाजारपेठेत जे विकले जाते, तेच आपणही पिकवले पाहिजे. त्यामुळे बदलते तंत्र ग्रामीण भागातील खेळाडूंनी अवगत करावे, असा सल्ला आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कुस्तीपटू पद्मर्शी सतपाल सिंग यांनी दिला.
सतपाल सिंग हे नुकतेच एका कार्यक्रमासाठी शहरात आले होते. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यसैनिक जानकीबाई कवडे प्रशालेला भेट देऊन शाळेची पाहणी केली. या भेटीदरम्यान सिंग यांनी विद्यार्थ्यांसोबत मुक्त संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची त्यांनी मनमोकळी उत्तरे दिली. यावेळी स्वातंत्र्यसैनिक डॉ. रवींद्र कवडे, संस्थेच्या संचालिका राज कवडे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका नंदकुमार लोणकर, सादिक सय्यद आदी उपस्थित होते.
सतपाल सिंग यांनी शाळेतील शारीरिक शिक्षण विभागातील शैक्षणिक साहित्यांची पाहणी केली. जानकीबाई आपटे प्रशालेतील विद्यार्थ्यांना कुस्तीविषयी प्रशिक्षण हवे असेल, तर त्यांना दिल्लीला आल्यानंतर आपल्या अकादमीत मोफत प्रशिक्षण देऊ, असे आश्वासनही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिले. डॉ. कवडे यांनी दिल्ली येथे जाऊन सिंग यांच्या गुरू हनुमान व्यायामशाळेतील मल्लांना वेळोवेळी प्रशिक्षण दिलेले आहे. त्याबद्दल सिंग यांनी गौरवोद्गार काढले. यावेळी अँड. योगेंद्र कवडे व प्रियंका कवडे या दाम्पत्याला त्यांनी आशीर्वाद दिले.