आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्तृत्वामुळेच नामदार गोखले युगप्रवर्तक- डॉ. मो. स. गोसावी यांचे प्रतिपादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- आपल्या कार्यकर्तृत्वामुळेच नामदार गोपाळ कृष्ण गोखले युगप्रवर्तक ठरले आणि त्याचा समाजाला फार मोठा फायदा झाला, असे प्रतिपादन गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांनी केले. बिटको महाविद्यालयात नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे जीवन कार्य आणि त्यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व आणि उपयुक्ततता या विषयावरील दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद‌्घाटनप्रसंगी ते बोलत होते.व्यासपीठावर ज्येष्ठ विचारवंत माजी आमदार डॉ. अशोकराव मोडक, हैदराबाद उस्मानिया विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एल. श्रीनिवास सुलु, सोसायटीच्या विभागीय सचिव डॉ. दीप्ती देशपांडे, ज्येष्ठ व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. विजय गोसावी, प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, डॉ. दिलीप बेलगावकर, डॉ. इंदिरा आठवले उपस्थित होते. दुपारच्या सत्रात नामदार गोखले यांचे आर्थिक विचार आणि शैक्षणिक कार्य, राष्ट्रीय विकासविषयक विचार हे दोन तांत्रिक सत्र पार पडले.
डॉ. दिलीप बेलगावकर, प्रा. सुनील जोशी, डॉ. आर. पी. देशपांडे, प्रा. अनिल सावळे, डॉ.सरिता औरंगाबादकर, डॉ. हेमलता भावसार, डॉ. अंजली गौतम यांच्यासह २५ प्राध्यापकांनी संशोधनपर प्रबंध सादर केले.
तर दुसऱ्या दिवशी (मंगळवारी) प्राथमिक शिक्षण सर्वांना सक्तीचे करण्याची गरज असून, सरकारी प्रशासन रयतेच्या हिताचे असावे, अध्यात्म हाच सार्वजनिक जीवनाचा आत्मा आहे हे गोखल्यांनी त्या काळी सांगितल्याचे प्राचार्य एस. बी. पंडित यांनी या वेळी व्यक्त केले. तांत्रिक सत्रात ३२ प्राध्यापकांनी संशोधनपर प्रबंध सादर केले. सहभागी प्राध्यापकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप केले. स्वागत, प्रास्ताविक प्राचार्य कुलकर्णी यांनी केले. या चर्चासत्राला िवद्यार्थ्यांनीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होेती.

शांततेसाठी सिद्धांत
नामदार गोखले यांनी मानवजातीच्या शांततेसाठी राजकारणाचे अध्यात्मीकरण झाले पाहिजे हासिध्दांत जपला. ते महात्मा गांधी यांना गुरुस्थानी मानत होते. उच्च शिक्षण समाजहितासाठी परिणामकारक व उपकारक ठरण्यासाठी कटिबध्द असावे असे ते म्हणत.
मो. स. गोसावी