आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुळा धरणात उतरले; सी-प्लेन 45 मिनिटांत मुंबईहून लँडिंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी- मुळा धरणाच्या जलाशयात रविवारी सकाळी 9.45 वाजता सी-प्लेन उतरले. हे विमान पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी झाली. यामुळे नगरमधील पर्यटनाला चालना मिळणार आहे. 15 मार्चपूर्वी ही सेवा सुरू होईल.

मेहेर कंपनीच्या या सेवेमुळे शिर्डी, शनी शिंगणापूर, मेहेराबाद, नगरचा भुईकोट किल्ला या स्थळांना भेट देणे सोपे होईल. त्यासाठी 4,500 भाडे असेल.

जुहू (मुंबई) येथून निघालेले हे नऊआसनी सेसेना व्हीटी केपिल सी-प्लेन धरणावर उतरले. विमानासाठी धरणाच्या पाण्यावर 300 मीटरची तरंगती हवाई पट्टी तयार करण्यात आली आहे. 10 मिनिटे सी-प्लेनने जलाशयावर फेरी मारली.

येथे सुरू होणार सी-प्लेन सेवा
पवना, भंडारदरा, लोणावळा, गणपती पुळे येथे काही दिवसांत सी-प्लेन सेवा सुरू होईल. त्यासाठी चाचण्या घेण्यात येणार आहेत.

संगणकाद्वारे पाण्याचा अंदाज
तज्ज्ञांनी लँडिंगपूर्वी पाण्याच्या स्थितीचा अंदाज घेतला. नंतर हवामान, टेकड्यांची पाहणी केली. ही माहिती संगणकाद्वारे त्यांनी मिळवली.