आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक सलोख्यासाठी ‘यशदा’, ‘बार्टी’ची शिबिरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमुळे सामाजिक वातावरण बिघडण्याची भीती निर्माण झाली आहे. गुन्हेगाराची कोणतीही जात नसते, धर्म नसतो. मात्र, अशा परिस्थिीत सामाजिक सलोखा एकता राखण्यासाठी जिल्हा प्रशासन यशदा, बार्टी संस्थेच्या मदतीने जिल्ह्यात शिबिरे कार्यशाळा घेणार आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी मंगळवारी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा दक्षता सनियंत्रण समितीच्या बैठकीत पालवे बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. एम. सोनवणे, सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे, जिल्हा महिला बाल विकासच्या अधिकारी एच. एम. खान, सामाजिक कार्यकर्त्या बेबी गायकवाड, वाय. एस. बत्तीसे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त माधव वाघ, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यात मुलींवर होणाऱ्या अत्याचारांबाबत बैठकीत गंभीरपणे चर्चा करण्यात आली. पालवे म्हणाले, गुन्हेगाराची कोणतीही जात नसते, धर्म नसतो. मात्र, जिल्ह्यात मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमुळे सामाजिक वातावरण बिघडण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थिीत सामाजिक सलोखा एकता राखण्यासाठी जिल्हा प्रशासन यशदा (यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधनी) बार्टी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था) यांच्या मदतीने जिल्ह्यात शिबिरे कार्यशाळा घेण्यात येणार आहे. सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रबोधनात्मक उपाय हाती घेण्यात आले आहेत. सामाजिक सलोख्यासाठी हे प्रबोधनात्मक उपक्रम आवश्यक आहेत. मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या दुर्देवी घटनांमुळे सामाजिक वातावरण दूषित होते. तालुकास्तरावर सामाजिक सलोखा कायम राहण्यासाठी शिबिरे कार्यशाळा घेण्यात येणार आहे. यापूर्वी सीएसआरडीच्या वतीने जिल्ह्याभरात सामाजिक प्रबोधनात्मक उपक्रम राबवण्यात अाले. यावेळी पथनाट्य, शिबिरे कार्यशाळा घेण्यासाठी सीएसआरडीचे सहकार्य घेण्यात येईल.

स्वयंसिध्दता फाउंडेशनच्या वतीने आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे अध्यक्ष बेबी गायकवाड यांनी सांगितले. नागरी हक्क सरंक्षण अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत नोंद झालेल्या गुन्ह्यांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...