आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निळवंडेचे स्टोरेज टँक करणार का? माजी मंत्री मधुकर पिचड यांचा राज्य सरकारला सवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - निळवंडे धरणाचे काम पूर्ण झाले असून कालव्यांचे काम अपूर्ण आहे. अशा परिस्थितीत सरकारने तुटपुंजी तरतूद केली असल्याने कालव्याचे काम पूर्ण होणार नाही. मग हे धरण केवळ जायकवाडीला पाणी सोडण्यासाठी स्टोअरेज टँक (साठवण टाकी) करायची का? असा सवाल माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.

निळवंडे धरणाचे काम पूर्ण झाले असून पाणी अडवण्यासाठी गेटचे काम सुरू आहे. सरकारने बजेटमध्ये या धरणासाठी कालव्यांसाठी ३५ कोटींची तरतूद केली आहे. सरकारकडून सुधारित प्रस्तावाला मंजुरी दिली जात नसल्याने या प्रकल्पाची किंमत हजार ४६९ कोटींवर जाईल. या धरणाचे काम शंभरटक्के पूर्णात्वाकडे असून गेटचे कामही सुरू करण्यात आले आहे. पण उपलब्ध निधीत कालव्यांचे काम पूर्ण होणार नाही. कालव्यांचे काम पूर्ण झाल्यास त्याचा लाभ राहाता, नेवासेपर्यंत मिळणार आहे. पण कालवे नसल्याने लाभक्षेत्रातील जनतेला या पाण्याचा लाभ होणार नाही. ठेकेदाराने केलेल्या कामाचे यापूर्वीचेच बिल प्रलंबित आहे. त्यात धरणाचे १२ कोटी, कालव्याचे कोटी, उच्चस्तर कालव्याचे ३२ कोटी, इतर ठेकेदारांचे २५ ते ३० कोटी देणे आहे. उपलब्ध निधीत हे देणी देखील देणे होणार नाही. अशा परिस्थितीत काम पूर्ण होणार नाही. त्यामुळे धरणात साठलेले पाणी नदीपात्रात सोडावे लागणार आहे. मग, हे धरण केवळ जायकवाडीला पाणी सोडण्यासाठी स्टोअरेज टँक करायचे का? यालाच आमचा विरोध आहे. अशा धोरणाचा आम्ही निषेध करतो. या प्रकल्पासाठी दरवर्षी २०० कोटी दिले, तर आठ वर्षांत हे काम पूर्ण होईल.
सध्या उच्चस्तरीय कालव्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. आतापर्यंत धरणावर ७८० कोटी खर्च झाला असून आणखी हजार ५०० कोटींची गरज भासणार आहे. वास्तविक या कामासाठी ८५ टक्के निधी केंद्र देणार आहे, उर्वरित १५ निधीची तरतूद राज्याला करायची आहे. यासंदर्भात वेळोवेळी शासनाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला आहे. परंतु त्याची दखल घेतल्यास आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असे पिचड यांनी सांगितले. यावेळी आमदार वैभव पिचड, आमदार राहुल जगताप, जि. प. सदस्य कैलास वाकचौरे, राजेंद्र फाळके, पांडुरंग अभंग आदी उपस्थित होते.

घनश्याम शेलार यांच्यावर कारवाई
राष्ट्रवादीचेमाजी जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार पूर्वी आमच्याबरोबर होते. पण ऐनवेळी ते बबनराव पाचपुतेंबरोबर गेले. त्यामुळे त्यांना आता पक्षातून काढावे लागेल. याची दखल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. त्यानुसार नोटीस बजावून कारवाई केली जाईल, असे पिचड यांनी जाहीर केले.

सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आंदोलन
निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन १० एप्रिलनंतर सध्या सुरू असलेले गेटचे काम बंद पाडण्यात येईल. अगोदर निधी द्या, मगच काम करा अशी आमची भूमिका राहील, असेही माजी मंत्री मधुकर पिचड यांनी सांगितले.

खासदार दिलीप गांधी यांची उडवली खिल्ली
खासदारदिलीप गांधी यांनी तंबाखू खाणारे अनेक शेतकरी आहेत, त्यांना कँसर झालाय का? तंबाखूने पचनही होते असे वक्तव्य केले होते. यावर मधुकर पिचड म्हणाले, गांधींमुळे माझ्या ज्ञानात भर पडली. आम्ही तंबाखूची किंमत मोजली कारण अाबा आमच्यातून गेले. तंबाखूमुळे कँसर होतो, हे डॉक्टरांचे रिपोर्ट आहेत. त्यामुळे या गोष्टींचे राजकारण करू नये. हे सरकार अंबानी आणि अदानींचे आहे, एवढे माहिती आहे, अशी खिल्लीही पिचड यांनी उडवली.