आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ उमेदवारी अर्ज छाननीत बाद; १६ प्रलंबित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा बँकेसाठी दाखल उमेदवारी अर्जांपैकी अर्ज छाननीत बाद ठरवण्यात आले. १६ अर्जांवरील निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे. छाननीनंतर आता २४१ उमेदवारांचे अर्ज शिल्लक आहेत.

शेतीपूरक बिगरशेती मतदारसंघासाठी आलेले सर्व अर्ज वैध ठरले. सोसायटी मतदारसंघात श्रीरामपुरातून रमेश नवले, पारनेरमधून नानासाहेब वरखडे राहुरीतून नवनाथ ढोकणे यांचे अर्ज मतदारयादीत नाव नसल्याने अवैध ठरवण्यात आले. पाथर्डीतून राणाप्रताप पालवे यांचा अर्ज एक वर्षाचा अनुभव नसल्याच्या कारणाने बाद ठरवण्यात आला. इतर मागासवर्गीय मतदारसंघातून जॉन खरात, तसेच अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून अशोक बागूल यांचा अर्ज ठराव नसल्याने अवैध ठरला. याच कारणावरून विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघातून गहिनीनाथ थोरे यांचा अर्ज बाद करण्यात आला. याच मतदारसंघातून दीपक कुऱ्हाडे यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. रावसाहेब ठुबे, रामचंद्र एरंडे, दत्ता आडसुरे, राजश्री गोरे, डॉ. भास्कर मोरे, दिलीप गाढवे, वैभव पाचारणे, माधव मेहेरखांब, रवींद्र पटेकर, काकासाहेब तापकीर, आशादेवी म्हस्के यांच्या अर्जांवरील निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे.

२४ एप्रिलला चित्र स्पष्ट
अर्जमाघारी घेण्याची मुदत २४ एप्रिल आहे. सोसायटी मतदारसंघातील १४ पैकी एक जागा बिनविरोध झाली असून शेवगावची जागाही बिनविरोध होण्याची शक्यता आहे. उर्वरित बारांपैकी दोन-तीन अपवाद वगळता इतर जागांवरील लढती एकतर्फीच होणार आहेत.