आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारच्या धडकेने 3 महिलांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेवगाव - भरधाव इंडिका कारने मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलांना जोरदार धडक दिली. यात तीन महिला जागीच ठार झाल्या, तर अन्य तिघी जणी गंभीर जखमी झाल्या. बुधवारी पहाटे साडेपाच वाजता शेवगाव-बोधेगाव रस्त्यावरील कांबी फाट्यावर ही घटना घडली. गयाबाई सीताराम दातीर (60), जनाबाई रंगनाथ मिसाळ (60), रुक्मिणी लक्ष्मण दारुणकर (65, चापडगाव, ता. शेवगाव) अशी ठार झालेल्या महिलांची नावे आहेत.

चापडगाव येथील काही महिला मॉर्निंग वॉकला निघाल्या होत्या. चापडगाव-बोधेगाव रस्त्यावर कांबी फाट्यानजीक या महिला व्यायाम करत होत्या.

शेवगावकडून बोधेगावकडे जाणार्‍या भरधाव इंडिकाची महिलांना जोरात धडक बसली. गयाबाई दातीर, जनाबाई मिसाळ, रुक्मिणी दारूणकर या तिघी जागीच ठार झाल्या, तर रशिदा निजाम पठाण, पुष्पा नंदकिशोर बाहेती व विमल बबन जोशी या गंभीर जखमी झाल्या. जखमी महिलांना शेवगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी इब्राहिम गुलाब पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंडिकाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक केशव राठोड करत आहेत.