आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुघल काळातील व्यंगचित्र वस्तू संग्रहालयात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- मुघल काळातील लघुचित्र शैलीत काढण्यात आलेले मुल्ला-दो-प्याजा हे व्यंगचित्र नगरच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात आहे. प्रारंभीच्या काळातील व्यंगचित्राचा हा उत्तम नमुना आहे, असे प्रसिद्ध व्यंगचित्रकार वसंत विटणकर यांनी सांगितले.

पुण्यात आयोजित व्यंगचित्रकार संमेलनाच्या पार्श्वभूमीवर व्यंगचित्रकलेविषयी संवाद साधताना विटणकर म्हणाले, जुन्या काळातील व्यंगचित्रे कशी असतील याचा नमुना नगरच्या संग्रहालयात पाहावयास मिळतो. मरतुकड्या घोड्यावर बसलेला जाडजूड मुल्ला-दो-प्याजा बघणार्‍याच्या मनात नकळत हास्य पेरून जातो, हे या चित्राचे वैशिष्ट्य आहे. कॅरिकेचर प्रकारातील उत्तम नमुना म्हणजे हे व्यंगचित्र आहे.

मुघलकाळानंतर मात्र व्यंगचित्रांचा प्रवाह सरस्वती नदीसारखा लुप्त झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात 1940-42 मध्ये नगरचे प्रसिद्ध चित्रकार र. बा. केळकर यांनी कम्युनिस्ट विचारसरणीतून काढलेली व्यंगचित्रे त्यातील आरेखन आणि कल्पकतेमुळे गाजली. ही चित्रे किलरेस्कर आणि त्या वेळच्या अनेक मासिकांतून प्रकाशित झाली होती, असे विटणकर यांनी सांगितले.

चित्रकार नाथ वैराळ यांनी 90च्या सुमारास राजकीय हास्यचित्रांचे साप्ताहिक सुरू केले होते, पण ते चालवण्यात अपयश आले, अशी आठवण विटणकर यांनी सांगितली.

कलासाधनेत मग्न.. वसंत विटणकर यांनी केसरी, सार्वमत, समाचार, लोकमत, नगर टाइम्स, लोक आवाज आदी दैनिकांत व्यंगचित्रे काढली आहेत. त्यांच्या चित्रकथा, हास्यचित्रे प्रसिद्ध आहेत. व्यंगचित्रांतून हास्यनिर्मिती, मनोरंजनाबरोबर त्यांनी प्रबोधनही केले.