आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर- मार्केटयार्डजवळ 26 लाखांची रोकड जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोतवाली पोलिसांनी जप्त केलेली २६ लाखांची रोकड. - Divya Marathi
कोतवाली पोलिसांनी जप्त केलेली २६ लाखांची रोकड.
नगर- मार्केटयार्ड परिसरात दोन संशयित व्यक्तींकडून पोलिसांनी सापळा रचून २६ लाखांची रोकड जप्त केली. ही कारवाई बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कोतवाली पोलिसांनी केली. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी सुरू असून ही रोकड हवाला रॅकेटमधील असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला. मात्र, गुरुवारी सायंकाळपर्यंत रोकडबाबतचा खुलासा झालेला नव्हता. 
 
बुधवारी रात्री मार्केटयार्ड परिसरात हवाला रॅकेटमार्फत मोठी रोकड येणार असल्याची माहिती कोतवालीचे पोलिस निरीक्षक अभय परमार यांना मिळाली. पोलिसांनी मार्केटयार्ड परिसरात सापळा लावून परिसर पिंजून काढला, मात्र त्यांना कोणी संशयित मिळाले नाही.
 
रात्री साडेनऊच्या सुमारास दुचाकी वाहनावरुन आलेले दोघांच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद वाटल्या. त्यामुळे पोलिसांनी त्यांना हटकले. त्या दोघांनीही वेगाने तेथून पळण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना शिताफीने पकडले. झडतीमध्ये त्यांच्याकडे २६ लाखांची रोकड मिळाली.
 
ही रोकड कोठून आणली, कोणाची आहे, कोणाला द्यायची आहे, या प्रश्नांची दोघांनीही व्यवस्थित उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. 
त्यांची नावे रणजित सोळंकी अजय ऊर्फ पप्पू सोळंकी (दोघेही गुजरात) अशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
पोलिसांनी रोकड जप्त करुन दोघांनाही पोलिस ठाण्यात आणले. ५०० रुपयांच्या नोटांचे १३ लाख, १०० रुपयांच्या नोटांचे लाख, तर उर्वरित हजार रुपयांच्या नोटा मिळून एकूण २६ लाख रुपयांची रोकड होती. पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक मशीनच्या साहाय्याने या नोटा मोजून त्यांचा पंचनामा केला. 
 
 
बातम्या आणखी आहेत...