आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय नगरमध्ये सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जातपडताळणी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाईन पध्दत महत्त्वाची भूमिका बजावेल, असे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी सोमवारी सांगितले.
रेव्हेन्यू सोसायटीत सामाजिक न्याय विशेष साहाय्य विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या नूतन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाचे उदघाटन करताना जिल्हाधिकारी कवडे बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त तथा अध्यक्ष जिल्हा जात पडताळणी समिती नाशिकचे प्रकाश पाटोळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा जात पडताळणी समितीचे सदस्य प्रकाश वायचळ, बार्टीचे प्रकल्प संचालक एस. वाय. कापसे आदी उपस्थित होते.

जनतेला लागणाऱ्या गोष्टी सुलभ, कालबध्द, अचूक, पारदर्शक पध्दतीने असाव्यात. त्यासाठी कायदे, नियमांचा अभ्यास करुन त्या जनतेपर्यंत पोहोचवल्यास संबंधित घटकाला निश्चित न्याय मिळेल, असे सांगून जिल्हाधिकारी कवडे म्हणाले, जात पडताळणी कार्यालय जिल्हयात सुरु व्हावे अशी मागणी होती. ती पूर्ण झाल्याने अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना याचा निश्चितच फायदा होईल. बिनवडे म्हणाले, जात पडताळणी प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असून हे कार्यालय नगर येथे सुरु झाल्याने लाभार्थ्यांना शिक्षण, निवडणूक, नोकरीसाठी आवश्यक असणारे जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी नाशिकल जावे लागणार नाही. प्रकल्प संचालक एस. वाय. कापसे, प्रकाश पाटोळे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रकाश वायचळ यांनी केले, तर आभार माधव वाघ यांनी मानले. या कार्यक्रमास रेव्हेन्यू सोसायटीचे अध्यक्ष विजय धोत्रे यांच्यासह सोसायटीचे संचालक, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सॅम्युअल वाघमारे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...