आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूसाठ्यांचे लिलाव होणार सप्टेंबरपासून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जलि्ह्यातील१७९ वाळूसाठ्यांचे तब्बल आठ वेळा ऑनलाइन लिलाव पुकारूनदेखील प्रतिसाद मिळाल्याने प्रशासनाने गेल्या महिन्यात पावसाचे कारण पुढे करून लिलावाची प्रक्रिया गुंडाळली. लिलावास थंड प्रतिसाद मिळाल्याने प्रशासनाला आता पुढच्या वर्षातील वाळूचे लिलाव घेण्याची घाई झाली असून, जुलैतच प्रशासनाने लिलावच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. नगर जलि्ह्यातील साठ्यांचे लिलाव सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत.

नगर जलि्ह्यातील नेवासे, पारनेर, श्रीगोंदे, संगमनेर, अकोले, कर्जत, जामखेड, श्रीरामपूर, राहुरी, पाथर्डी, शेवगाव या तालुक्यांमधील मुळा, प्रवरा, गोदावरी, भीमा सीना या नदीपात्रांमध्ये प्रशासनाचे एकूण १७९ वाळूसाठे आहेत. या साठ्यांच्या लिलावातून प्रशासनाला दरवर्षी कोट्यवधींचा महसूल मिळतो. या साठ्यांच्या विक्रीसाठी प्रशासनाने आतापर्यंत तब्बल आठवेळा लिलाव पुकारले. जलि्ह्यातील १७९ साठ्यांपैकी केवळ २५ साठ्यांचे ऑनलाइन लिलाव झाले आहेत. उर्वरित १५३ साठ्यांचे लिलाव होणे बाकी आहे. या साठ्यांच्या लिलावामधून प्रशासनाला २० कोटींहून अधिक महसूल मिळेल, असा अंदाज होता. मात्र, केवळ २५ साठ्यांचे लिलाव झाल्याने प्रशासनाला केवळ कोटी ७६ लाखांचा महसूल मिळाला.

तीन महिन्यांपूर्वी मुळा, प्रवरा, गोदावरी, भीमा सीना या नद्यांमध्ये अनधिकृतपणे वाळूउपसा करणा-यांविरुध्द महसूल पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई सुरू करुन वाळूउपसा करणारी वाहने पकडून दंड केला. मात्र, आता ही कारवाईही थंडावली आहे. लिलाव झाल्याने जलि्ह्यात चोरट्या मार्गाने वाळूउपसा सुरूच आहे. अनधिकृत वाळूउपशावर कारवाई केल्यामुळे सर्व साठ्यांचे लिलाव होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली. २७ मे रोजी शेवटचा वाळू लिलाव झाला. त्यावेळी केवळ साठ्यांची विक्री झाली. लिलावाकडे व्यावसायिकांनी पाठ फिरवली.

२०१५-१६ वर्षासाठी गौण खनजि विभागाने वाळू लिवावाची प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. गेल्या वेळी लिलावास प्रतिसाद मिळाल्याने घाईघाईने ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लिलावासाठी गौण खनजि विभागाने भूजल यंत्रणेकडून अहवाल मागवला आहे. त्याचबरोबर ग्रामसभेची परवानी घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. पर्यावरण अहवाल ग्रामसभेच्या परवानगीनंतर जुलै अखेर या प्रक्रियेला सुरुवात होईल. पर्यावरण कमेटी प्राधिकरणाच्या परवानगीनंतर सप्टेंबरपासून प्रत्यक्ष ऑनलाइन लिलाव घेण्यात येतील.
ऑक्टोबरमध्ये ताबा देणार
आठवेळा ऑनलाइन लिलावाची प्रक्रिया घेण्यात आली. जलि्ह्यात असलेल्या १७९ साठ्यांपैकी २५ साठ्यांचे लिलाव झाले आहेत. त्यातून कोटी ७६ लाख प्रशासनाला मिळाले. पावसाळा सुरू झाल्यामुळे जून महिन्यात ललिावाची प्रक्रिया बंद करण्यात आली होती. आता २०१५-१६ या वर्षातील लिलाव करण्यासाठी कालावधी ठरवून घेण्यात आला आहे. सप्टेंबरमध्ये वाळू लिलावाची प्रक्रिया सुरू होईल. ऑक्टोबर महिन्यात वाळूसाठ्यांचा ताबा दलिा जाणार आहे.'' आर.एच. ब्राह्मणे, गौण खणीकर्म अधिकारी, नगर.