आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्मचारी, ग्राहकांसाठी "सीबीएस' सेवा डोकेदुखी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शहरास हजिल्ह्यातील नऊ टपाल कार्यालयांत ग्राहकांसाठी (खातेदार) कोअर बँकिंग सिस्टिम (सीबीएस) ही ऑनलाइन सेवा सुरू करण्यात आली. या सेवेमुळे देशातील कोणत्याही पोस्ट कार्यालयातील बचतीसह अन्य बँकिंगचे व्यवहार या कार्यालयामार्फत होतील, अशी अपेक्षा ग्राहकांना होती. मात्र, ही सेवा कर्मचाऱ्यांसह ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. बऱ्याच वेळा ही सेवा बंद असते, तर काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना या सिस्टिमबद्दल माहिती नसल्याने ग्राहक वैतागत आहेत.
सर्जेपुरा टपाल कार्यालयात जानेवारीत कोअर बॅँकिंग प्रणाली सुरु झाली. मात्र, या कार्यालयात दुसऱ्याच दिवसांपासून ही सेवा नेटवर्कअभावी सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानासोबत जुळवून घेत स्पर्धेत टिकण्याचा प्रयत्न करणाऱ्या टपाल खात्याच्या ग्राहकांच्या पदरी निराशा पडली आहे. नेटवर्क फेलमुळे सर्व संगणक बंद आहे. सिस्टिममध्ये सीबीएसचे बॅँकेचे कामकाज व्यवहार होणार नाही, असे कर्मचारी सांगतात. मुख्य डाकघर, सर्जेपुरा, मिरजगाव (ता. कर्जत), मिन्टोलेन, भिंगार, भिंगार वेस, सोनई (ता. नेवासे), एमआयडीसी या टपाल कार्यालयांमध्ये सीबीएस सुरू करण्यात आली. ग्राहकांना राष्ट्रीयीकृत बॅँकांप्रमाणे या प्रणालीद्वारे तातडीने पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
सर्वोत्तम सुविधेसाठी टपाल खाते प्रयत्नशील राहील, कोअर बँकिंग प्रणालीमुळे टपाल खात्याच्या लाखो ग्राहकांना घरबसल्या बँकिंग सेवा मिळेल, असे वरिष्ठांनी सांगितले होते. मात्र, उलट अनुभव ग्राहकांना येत आहे. रखडत रखडत सुरू असलेल्या या सेवेने टपाल कार्यालयाच्या कामकाजावरही परिणाम झाला आहे. बचत खाते, पैसे काढणे, नवीन खाते उघडणे आदी कामे रेंगाळली आहेत. टपाल कार्यालयत अनेक ग्राहक आर्थिक व्यवहारासाठी येतात. मात्र, या खंडित सेवेमुळे नेटवर्क फेलमुळे ग्राहकांना माघारी जावे लागते. त्यामुळे ही सेवा नसलेलीच बरी होती, अशी प्रतिक्रिया देतात.

या संदर्भात प्रवर अधीक्षक एस. एस. शिरसी यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. ते टपाल कार्यालयाच्या कामासाठी गेले असल्याचे टपाल कार्यालयाकडून सांगण्यात आले.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, प्रशिक्षणच नाही, तीन दिवसांत काय शिकवणार?
बातम्या आणखी आहेत...