आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रप्रमुखाने केला १५ लाखांचा अपहार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राहुरीतालुक्यातील देसवंडी येथील केंद्रप्रमुख भाऊसाहेब चोखर यांनी विद्यार्थी शिष्यवृत्ती पोषण आहार मेहनतानाचे १५ लाख रुपये काढले आहेत. या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी चोखर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकारी बी. वाय. धनवे यांना दिले आहेत.
विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती पोषण आहाराच्या मेहनतांची सुमारे १५ लाखांची रक्कम केंद्रप्रमुख चोखर यांनी एप्रिल-मे २०१४ मध्ये काढली. याप्रकरणी विस्तार अधिकारी चंद्रकांत सोनार डी. के. राऊत यांना चौकशीचे आदेश दिले होते. या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल जून २०१४ मध्ये जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता. अपहारीत रकमेचा अजूनही भरणा झाल्याने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मेहनताना मानधनापासून वंचित रहावे लागले आहे. याप्रकरणी नवाल यांनी चोखर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले असल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार गटशिक्षणाधिकाऱ्यांनी विस्तार अधिकारी सोनार यांना दाखल करण्याचे आदेश दिलेत. तथापि गुन्हा दाखल झाला नाही. शिक्षण विभागाकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप सामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात सोनार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मी लग्न समारंभात असल्याचे सांगून बोलण्यास नकार दिला.