आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्र राज्य सरकार शेतकरीविरोधी, अजित पवार यांचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोले - केंद्र सरकारला शरद पवार यांनी साखर निर्यात करण्याची मागणी केली होती. मात्र, निर्यात धोरण घेताना या सरकारने ९५ रुपयांचा निर्यात टॅक्स १४५ रुपये केला. निर्यात करून ऊस उत्पादकांना काही दिले नाही. पण शेतकऱ्यांचेच ४५ रुपये काढून घेतले. आता निर्यातीवरही २० टक्के टॅक्स लावणार आहेत. कांद्याची अवस्था बिकट आहे. पाण्याची बाटली २० रुपयांना मिळतेय, पण दुधाला दर १७ १८ रुपये लिटर आहे. हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

निळवंडे धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष विठोबा गणपत आभाळे यांनी लिहिलेले "कथा निळवंडे धरणाची' या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी अजित पवार यांच्या हस्ते साई लॉन्स इंदोरी फाटा येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकर पिचड होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बाळासाहेब थोरात होते.

पवार म्हणाले, आधुनिक काळातील महायुद्ध जमिनीवरून घडता ती पाण्यावरून घडतील, असे मला काकांनी सांगितले होते, त्याचा अनुभव आपण घेत आहोत. नगर, मराठवाडा, पुणे शहर-ग्रामीणचे पाण्याचे वाद न्यायालयात गेले. मात्र, माणुसकीच्या भावनेने याचा विचार केला पाहिजे. दुष्काळामुळे मराठवाड्यातील लोकांनी स्थलांतर केले. उच्च न्यायालयाने सांगितले की, दुष्काळ जाहीर करा, पण हे सरकार करत नाही. कर्जमाफीही देत नाही. यासाठी आम्हाला आंदोलने करावी लागत आहेत. या सरकारकडून नवीन योजना जाहीर केल्या नाही, तर आमच्याच योजनेला जलयुक्त शिवार असे नाव दिले. नगर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, जत, आटपाडी या भागात एकही जनावरांची छावणी सुरू नाही. कर्जाच्या पुनर्गठणात शेतकऱ्याला काही मिळाले नाही. सिंचन प्रकल्प लांबणीवर पडले. ते लांबल्याने प्रकल्प किंमत वाढणार आहे. मात्र, यांनी आमची बदनामी केली. निळवंडे धरणामुळे तालुक्यात दुष्काळाची तीव्रता कमी होण्यासाठी मदत झाली आहे. आभार यशवंत आभाळे यांनी मानले.

साखर कारखाने अडचणीत
दुष्काळानेपाणी परिस्थिती गंभीर झाल्याने या वर्षी उसाची कमतरता जाणवणार आहे. जनावरांना चारा उपलब्ध नसल्याने चाऱ्यासाठी ऊसतोड होत आहे. नवीन ऊस लागवडीसाठी बेणे म्हणून ऊसाचे क्षेत्रात उल्लेखनीय कमी जाणवणार आहे. यामुळे यावर्षी कारखाने सुरू करण्यात अडचणींना सामोरे जावे लागेल, असे पवार म्हणाले.

सरकारचे रोज नवीन प्रकरण
रोजनवे भ्रष्टाचार बाहेर पडत आहेत. म्हणे खडसेंनी भ्रष्टाचार केला नाही. मग त्यांचा राजीनामा का घेतला. चिक्की, डाळ घोटाळ्याचे काय झाले? भ्रष्टाचार केला नाही, असे सांगून वेळ मारून नेली जाते. महाजन, तर प्रतिज्ञापत्रात स्वतःची पाच एकर जमिनीच विसरले. भाजप सरकारची रोज नवीन प्रकरण पुढे येत आहेत, असे पवार म्हणाले.
'कथा निळवंडे धरणाची' या पुस्तकाचे प्रकाशन करताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार. समवेत मधुकर पिचड, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार वैभव पिचड, सीताराम गायकर, चंद्रशेकर घुले आदी. छाया: राजेंद्र मालुंजकर.
बातम्या आणखी आहेत...