आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय निवडणूक निरीक्षकांचा वॉच, अधिसूचना डिसेंबरला जारी होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर; विधान परिषद निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. निवडणुकीच्या कालावधीत राजकीय पक्ष अथवा उमेदवाराने खासगी किंवा सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्यास तीन महिने तुरुंगवास किंवा दोन हजार रुपये दंडाची शिक्षा केली जाईल, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी बुधवारी दिली.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कवडे बोलत होते. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यावेळी उपस्थित होते.

कवडे म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून आचारसंहिता मंगळवारी रात्रीपासूनच जारी झाली आहे. अधिसूचना डिसेंबरला निघेल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत डिसेंबर आहे. उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनातील जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात सकाळी ११ ते दुपारी या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी १० डिसेंबरला होणार असून, १२ डिसेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. २७ डिसेंबरला मतदान होणार असून, महासैनिकी लॉन येथे ३० डिसेंबरला मतमोजणी होईल.

अर्ज दाखल करताना जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात उमेदवारासमवेत केवळ पाच व्यक्तींना प्रवेश मिळेल. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचे नाव राज्याच्या कुठल्याही विधानसभा मतदारसंघात असणे बंधनकारक आहे. या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य, तसेच श्रीगोंदे, पाथर्डी, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव, राहुरी, संगमनेर देवळाली प्रवरा या नगरपरिषदांचे, तसेच शिर्डी, अकोले, कर्जत, पारनेर या नगर पंचायतीचे सदस्य या निवडणुकीत मतदार असतील.

निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालये, शिर्डी येथील साईनाथ माध्यमिक विद्यालय देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद शाळांसह १६ मतदान केंद्ो निश्चित करण्यात आली आहेत. निवडणुकीत राजकीय पक्ष उमेदवाराने खासगी किंवा सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्यास महिन्यांपर्यंत तुरुंगवास अथवा दोन रुपये दंडाची कारवाई करण्यात येईल.
निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. या निवडणुकीत खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी अनामत रक्कम दहा हजार रुपये, तर अनुसूचित जाती-जमाती वर्गातील उमेदवारांसाठी हजार आहे. उमेदवारांनी संपत्ती विवरणपत्र भरणे बंधनकारक असणार आहे. या निवडणुकीत दहा पक्षीय उमेदवारांना १० अनुमोदक असणे आवश्यक आहे. आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी महापालिका अधिकाऱ्यांचे पथक स्थापन करण्यात येणार आहे, असे कवडे यांनी सांगितले.

मतपत्रिकेवर छायाचित्र
लोकसभा विधानसभा निवडणुकांमधील मतपत्रिकेवर केवळ उमेदवाराचे नाव त्यांचे चिन्ह छापण्यात येत होते. या निवडणुकीत प्रथमच मतदानपत्रिकेवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचे छायाचित्र असणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करतानाच उमेदवारांनी तीन महिन्यांच्या आत काढलेले छायाचित्र देणे आवश्यक आहे.

सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक
विधानपरिषदनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रक्रियेची माहिती देण्यासाठी गुरुवारी (२६ नोव्हेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली आहे. गुरुवारीच मतदारांची प्रारूप याद्या प्रसिध्द केल्या जाणार आहेत. या याद्यांवर डिसेंबरपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची शासकीय वाहने ताब्यात घेण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आले आहेत.'' अनिल कवडे, जिल्हानिवडणूक निर्णय अधिकारी