आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शौचास उघड्यावर नको... सीईओंनी फेसबुकवरून साधला विद्यार्थी, पालकांशी संवाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- लोकांना का कळत नाही, किती दिवस उघड्यावर शौचास जाणार? घरात जर शौचालय नसेल तर आरोग्यावर परिणाम होतो, अर्थिक भुर्दंड कुटुंबीयांना बसते. उघड्यावर जण्याची प्रथा बंद केली पाहिजे. असे भावनिक आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड यांनी लाइव्ह फेसबुकद्वारे विद्यार्थी, पालक, ग्रामस्थांशी केले. 

जिल्हा परिषदेमध्ये आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. भारूड यांनी जिल्हा परिषदेच्या फेसबुक पेजवरून लाइव्ह मार्गदर्शन केले. डॉ. भारूड यांच्या कक्षात जिल्हा परिषद शाळा कवठे येथील विद्यार्थी सहभागी होते. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारले, त्यावर सीईओंनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली. जिल्ह्यातील विद्यार्थी, ग्रामस्थांनी स्वच्छतेची शपथ घेतली. यशवंतराव चव्हाण सभागृहात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थितांनी केले. याे प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, विजय लोंढे, गौतम जगदाळे, शिक्षणाधिकारी संजय राठोड, गिरी, देवकर, सचिन जाधव, बळीराम नागणे, अविनाश गोडसे, त्रिमूर्ती राऊत, श्रीधर कलशेट्टी, महादेव शिंदे, दिलावर शेख उपस्थित होते. 

कारवाई नाही 
जिल्हापरिषदेमध्ये उघडकीस आलेल्या गैरप्रकारावर अद्याप ठोस कारवाई केलेली नाही. करमाळा पंचायत समिती रोपवाटिकेतील गैरप्रकार, माढा तालुक्यातील ३८ बोगस शौचालय, टेंभुर्णी गाळे वाटप प्रकरण, अपंग प्रमाणपत्र बोगस शिक्षक चौकशी आदी प्रकरणांवर ठोस कारवाई हाेेईल, अशी अपेक्षा डॉ. भारूड यांच्याकडून होती. पण प्रत्यक्षात कारवाई होताना दिसत नाही. 

१० लाख नागरिकांनी लाभ घेतल्याचा दावा 
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारूरुड यांच्या लाइव्ह फेसबुक कार्यक्रम कौतुकास्पद आहे, विविध स्तरातून कौतुक होत आहे. या कार्यक्रमाचा १० लाख नागरिकांनी लाभ घेतल्याचा दावा जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे. विद्यार्थी नागरिकांमध्ये स्वच्छताविषयी जागृती करण्याचे काम होत असून, त्यामुळे शौचालय बांधण्यास सुरुवात होईल. एकेकाळी शाळेत मोबाइल वापरायचा नाही तेच शिक्षक आता हातात मोबाइल घेऊन विद्यार्थ्यांना शिकवत आहेत
बातम्या आणखी आहेत...