आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट पदवीप्रकरणी आता सीईओंनी ठेवले तोंडावर बोट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - हिंदीसाहित्य संमेलन प्रयाग, अलाहाबाद व्यापीद्याठाची शिक्षा विशारद ही बनावट पदवी संपादित करणा-या प्राथमिक शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी सक्त ताकीद देऊन सोडलेले आहे. याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी सर्वसाधारण सभेत प्रा. संजय पाटील यांनी विषय उपस्थित केला होता. यासंदर्भात गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकां-यांना विचारणा केली असता आमच्या दृष्टीने हा विषय संपला असल्याचे सांगत या विषयावर बोलण्यास नकार दिलेला आहे. मुख्य कार्यकारी अधिकां-यांनी याप्रकरणी मौन बाळगणे ही बाब शंकेला जागा करून देत हे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांनी पदोन्नतीच्या लाभासाठी हिंदी साहित्य संमेलनाची शिक्षा विशारद ही पदवी संपादित केली आहे. त्यात तब्बल ७१ शिक्षकांनी सेवा पुस्तकात नोंदही केली आहे. या पदव्यांचा भोंगळ कारभार ‘दिव्य मराठी’ने उघडकीस आणल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी झाली. त्यात शिक्षा विशारद ही पदवी महाराष्ट्र शासनाच्या बीएडतुल्य अभ्यासक्रमाच्या यादीत नसल्याचे समोर आले. तसेच ज्या व्यापीठातून ही पदवी संपादित करण्यात आली आहे, ते व्यापीठ अस्तित्वातच नसल्याचे स्पष्ट झाले. चौकशी अहवालाच्या अनुषंगाने ७१ शिक्षकांकडूनच परिशिष्ट एक ते चार भरण्यास सुरुवात करण्यात आली.
या शिक्षकांनी खुलासे सादर केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकांनी या सर्वच शिक्षकांना सक्त ताकीद देत त्यासंदर्भात लाल शाईने सेवा पुस्तकात नोंद करण्यात आलेली आहे. दरम्यान कारवाई करीत असताना या शिक्षकांनी निव्वळ लाभाचा प्रयत्न केला असल्याने सौम्य कारवाई करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकांचे म्हणणे आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी प्रा. संजय पाटील यांनी सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या अनुषंगाने गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांना विचारणा केली असता हा विषय आमच्या दृष्टीने संपला असून, यासंदर्भात काहीही बोलण्यास रस नसल्याचे उत्तर दिले आहे. एकंदरीत देशमुख यांची या प्रकरणातील शांतता मोठी बोलकी प्रतिक्रिया आहे. ज्या अर्थी देशमुख बोलण्यास तयार नाहीत त्या अर्थी या प्रकरणात गौडबंगाल असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

‘दिव्य मराठी’चा पाठपुरावा
शिक्षाविशारद प्रकरणात सुरुवातीपासून ‘दिव्य मराठी’ने पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच प्रशासनाने शिक्षा विशारद पदवी धारण केलेल्या शिक्षकांच्या बाबतीत चौकशी अहवाल तयार केला. हा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकांकडे सादर करण्यात आला. तसेच याबाबत अलाहाबाद तसेच पिंपळनेर आदी ठिकाणी चौकशीही करण्यात आली.

शिक्षणाधिकारी म्हणतात
शिक्षकांनीलाभ घेतलेला नसल्याने कारवाई सौम्य करण्यात आलेली आहे. तसेच लाल पेनने सेवा पुस्तकात नोंद करण्यात आलेली आहे. ७१ पैकी ६७ शिक्षकांच्या सेवा पुस्तकात कार्यालयाकडून लाल पेनने नोंद करण्यात आलेली आहे. मोहनदेसले, शिक्षणाधिकारी
बातम्या आणखी आहेत...