आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अट्टल मंगळसूत्र चोर गजाआड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लांबवणार्‍या अट्टल चोराला जेरबंद करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले. सोन्या अशोक बेग (27, डावखर वस्ती रस्ता, श्रीरामपूर) असे त्याचे नाव असून न्यायालयाने त्याला 27 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

अट्टल गुन्हेगार चन्या बेग याचा तो भाऊ आहे. चन्या तुरुंगात असल्याने सोन्या हा चन्या गँगचा प्रमुख म्हणून काम पाहतो. चन्या गँग खंडणी, सुपार्‍या घेऊन खून, धूमस्टाईलने दागिन्यांची चोरी यासाठी कुप्रसिद्ध आहे. पोलिसांनी सोन्या बेगला गेल्यावर्षी अटक करून दागिने हिसकावण्याच्या अकरा गुन्ह्यांचा छडा लावला होता. अकरा गुन्ह्यांतील तीस तोळे सोने त्याच्याकडून हस्तगत करण्यात आले. तो नुकताच बाहेर आला होता. उपनगरात पुन्हा दागिने चोर्‍या वाढल्याने तोफखाना पोलिसांसमोर या घटना रोखण्याचे आव्हान निर्माण झाले होते.

श्रीरामपूर येथील राहत्या घरी मंगळवारी पहाटे त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला 27 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.