आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात पुन्हा धूमस्टाइल मंगळसूत्र चोऱ्यांचे सत्र सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - उपनगरातून धूमस्टाइल पद्धतीने मंगळसूत्र चोऱ्या करण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी तोफखाना हद्दीतील उपनगरात चार वेगवेगळ्या ठिकाणी धूमस्टाइल मंगळसूत्र चोरीच्या घटना घडल्या. या प्रकारांमध्ये एकूण सुमारे साडेतीन लाख रुपयांचे सोने चोरीला गेले आहे. या घटना नवनागापूर, सावेडी, गुलमोहोर रोड, बालिकाश्रम रोड या परिसरात घडल्या. या घटनांमुळे पोलिसांची डोकेदुखी पुन्हा वाढली आहे.

नवनागापुरातील पुष्पा संभाजी तळेकर या गिते लॉन्समध्ये असताना नंबर नसलेल्या एका दुचाकीवरून दोन अनोळखी चोर तेथे आले. त्यांनी ९७ हजार ५०० रुपयांचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून पळ काढला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. दुसरी घटना गुलमोहोर रोडवर घडला. वैशाली संतोष पवार रा. कोहिनूर मंगल कार्यालयामागे या मुलाला क्लासला सोडवण्यासाठी जात असताना सीबीझेड दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र ओरबाडून धूम ठोकली. तोफखाना पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

तिसरा प्रकार गुलमोहोर रोड परिसरात घडला. विजयलक्ष्मी मंगलारप रा. पारिजात कॉलनी या केदारी मॅडम यांच्यासह दुचाकीवरून जात होत्या. ममता गॅस एजन्सीजवळ पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील चोरांनी लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून धूम ठोकली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा नोंदवला आहे, तर सावेडी परिसरात पत्ता विचारण्याचा बहाणा करून आशा राजेंद्र राशिनकर यांच्या गळ्यातील ५० हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी आेरबाडले. हे चोरटेही सीबीझेड दुचाकीवरून आलेले होते.
बातम्या आणखी आहेत...