आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चायना मांजा प्रकरण - गाजर दाखवून आयुक्त कुलकर्णींचा मनविसेकडून निषेध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहरात चायना मांजाच्या विक्रीवर बंदी असतानाही महापालिकेकडून त्याची अंमलबजावणी होत नाही. ही बंदी झुगारून सर्वत्र चायना मांजाची विक्री सुरू आहे. त्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) कार्यकर्त्यांनी आयुक्त विजय कुलकर्णी यांना शुक्रवारी (२ जानेवारी) गाजरे दाखवली.

चायना मांजाचा वापर केल्यामुळे शहरात अनेकजण जखमी झाले आहेत, तसेच पक्षनांही या मांजामुळे इजा होऊन त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. महापालिकेने शहरात चायना मांजा विक्रीवर बंदी घातली असतानाही चायना मांजाची शहरात सर्रास विक्री सुरू आहे.

या विक्रीकडे महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करत आहेत. चायना मांजामुळे एखाद्याला प्राण गमवावा लागला, तर त्यास जबाबदार कोण असा सवालही कार्यकर्त्यांनी आयुक्तांना केला.
बंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देऊन आयुक्तांना गाजरे दाखवली.

यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव सुमित वर्मा, शहराध्यक्ष परेश पुरोहित, शुभम नगरकर, प्रसाद रेणावीकर, सोहेल शेख, संदीप बुरके, अभिषेक मोरे आदी उपस्थित होते.