आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खैरी निमगावच्या ग्रामसभेत चॉपरने हल्ला; दोन जण गंभीर जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- ग्रामसभेत झालेल्या मारहाणीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे दोन कार्यकर्ते गंभीर जखमी झाले. ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथे मंगळवारी सकाळी घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात सातजणांविरुद्ध दंगल व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साईनाथ बनकर या तरुणास काही दिवसांपूर्वी मारहाण झाली. त्यावेळी आरोपींविरुद्ध पोलिसांकडे तक्रार करणारे निवेदन देण्यात आले होते. निवेदनावर सह्या असणार्‍यांना मारहाण सुरू होती. दहशतीमुळे कोणी फिर्याद देत नव्हते. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गणेश भाकरे हे मारहाण झालेल्यांना भेटण्यासाठी गेले. त्याचा राग आल्याने भाकरे यांना गणेश रावसाहेब शेजूळ व सागर अप्पासाहेब दुशिंग यांनी धमकी दिली. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास उपसरपंच शिवाजी शेजूळ यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा बोलावण्यात आली होती. सभेला आदिनाथ झुराळे, सुंदरभान भागडे, लहानू शेजूळ, तुकाराम काजळे यांच्यासह गावकरी उपस्थित होते. तेवढय़ात सात-आठजण ग्रामसभेत आले. त्यांनी ‘‘तुम्ही ग्रामसभा घेता काय? आम्ही 50 हजारांत पोलिस विकत घेतले आहेत. ते बंदोबस्ताला येणार नाहीत. तुला कायमचे संपवतो..’’ असे म्हणत विक्रम नारायण परदेशी याने भाकरे यांच्यावर चॉपरने हल्ला केला.