आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाच मागणाऱ्या भू करमापकावर गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कोपरगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक सुनील आसाराम काळे (३३) याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंदवला आहे. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली. काेपरगाव तालुक्यातील सोयगाव येथील एका तक्रारदाराची वडिलोपार्जित शेतजमिनीची माेजणी करून पोटहिस्से करून देण्यासाठी पंचांसमक्ष १० हजारांची लाच मागितली. परंतु, लाचलुचपतच्या सापळ्याबाबत संशय आल्यामुळे त्याने रक्कम स्वीकारली नाही. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलिस उपअधीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. सुनील काळेविरुद्ध राहाता पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

एलसीबीचे दोन हॉटेलांवर छापे
अवैधदारुविक्री करणाऱ्या दोन हॉटेलांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापे टाकले. नेवासे तालुक्यातील वरखेड सुकळी शिवारात बुधवारी सायंकाळी ही कारवाई केली. वरखेड येथील छाप्यात एकाला ताब्यात घेऊन १० हजार ८७४ रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त केली, तर सुकळी गावात टाकलेल्या छाप्यात एका आरोपीला ताब्यात घेत हजार ५१९ रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त केली. पोलिस हेडकॉन्स्टेबल मन्सूर सय्यद, योगेश गोसावी, उमेश खेडकर, राहुल हुसळे, शैलेश गोमसाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. दोन्ही आरोपींना नेवासे पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...