आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्डे बुजवण्याच्या मागणीसाठी महापालिकेत ठिय्या, छावा संघटनेचे आंदोलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- प्रमुख रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवण्याच्या मागणीसाठी छावा संघटनेने शुक्रवारी महापालिकेत ठिय्या आंदोलन केले. मनपात एकही सक्षम अधिकारी नसल्याने आंदोलकांनी आयुक्तांच्या दालनाबाहेरील पाटीला पुष्पहार घालून ठिय्या दिला. 

आंदोलनात महिला जिल्हाध्यक्ष सुरेखा सांगळे, युवक आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता वामन, योगेश पवार, किरण उंडे, भरत लवांडे, दत्ता इरले, पप्पू तोडमल, सतीश वाघ, आकाश धनवळे, तुषार शिंदे सहभागी झाले होते. मनपाने शहरातील प्रमुख रस्त्यांचे काही दिवसापूर्वी पॅचिंग केले होते. पावसातच पॅचिंग उखडून रस्त्यांची दुरवस्था झाली. खड्डे चुकवताना दररोज अपघात होत आहेत. खड्डेमय रस्त्यांनी नागरिकांना पाठदुखीच्या व्याधी सुरु झाल्या अाहेत. त्यामुळे तातडीने शहरातील प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती करण्याच्या मागणीचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले. तातडीने हे काम हाती घेण्याचे आश्वासन आयुक्तांनी आंदोलकांना दिले. सात दिवसांत रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला. 
 
बातम्या आणखी आहेत...