आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छाया-दीपाली चित्रपटगृहाला महापालिकेने ठोकले सील

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - थकीत मालमत्ताकराच्या वसुलीसाठी महापालिकेने पुन्हा जप्ती मोहीम सुरू केली आहे. लाखो रुपयांची थकबाकी असलेल्या छाया व दीपाली चित्रपटगृहाला बुधवारी सील ठोकण्यात आले. या कारवाईमुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.
उपायुक्त स्मिता झगडे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग अधिकारी के. सी. वर्मा, ए. डी. साबळे, बी. के. बुचकूल, एस. बी. तडवी, कर निरीक्षक एन. बी. गोसावी यांच्या पथकाने ही कारवाई केली. मनपाची जप्ती मोहीम मध्यंतरी थंडावली होती. त्यामुळे थकबाकी भरणा-यांचे प्रमाण कमी झाले होते. यासंदर्भात आयुक्त संजय काकडे यांनी नुकतीच सर्व वसुली अधिका-यांची बैठक घेऊन त्यांना धारेवर धरले. प्रत्येकाला वसुलीचे उद्दिष्ट त्यांनी ठरवून दिले.
मनपाने यंदा मार्चअखेर 50 कोटी थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट ठेवले असून आतापर्यंत केवळ 22 कोटींचीच थकबाकी वसूल झाली आहे. उर्वरित थकबाकी वसूल करण्यासाठी छाया व दीपालीला बुधवारी सील ठोकून पुन्हा जप्तीचा बडगा उगारण्यात आला आहे.
चितळे रस्त्यावरील छाया चित्रपटगृहाच्या मालकाकडे 12 लाखांचा मालमत्ता कर, शास्ती व दंड अशी रक्कम थकीत आहे. अनेक दिवसांपासून बंद असलेल्या झेंडीगेट भागातील दीपालीच्या मालकाकडे 33 लाख 90 हजार 797 मालमत्ता कर, शास्ती व दंड थकीत आहे.