आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या दुकानावरील गुन्ह्याला पती साक्षीदार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - ज्यादुकानात स्वस्त धान्याचा काळाबाजार चालतो, त्याच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करताना वेगळेच नाव... गुन्ह्याला साक्षीदार कोण? तर प्रत्यक्ष काळाबाजाराचा गुन्हा दाखल झालेल्या मालकिणीचा नवरा दीर... हा साक्षीदार नवरा असा की, ज्याच्याविरोधात या संदर्भात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. यातून गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांच्या भूमिकेबद्दलही संशय निर्माण होण्याचा हा प्रकार उघडकीस आला आहे. असे गुन्ह्याच्यावेळी खऱ्या मालकाचे नाव बदलण्याच्या प्रकारामुळे धान्याच्या काळ्याबाजाराच्या गुन्ह्याचे पुढे काय होणार, हेही स्पष्ट होते.
सरकारच्या स्वस्त धान्य दुकानांतील धान्याच्या काळाबाजाराबाबत कायम चर्चा होत असते. या काळ्याबाजाराची व्याप्ती अतिशय भयानक आहे. त्याचे हे प्रातिनिधीक उदाहरण आहे. गेल्यावर्षी २१ ऑक्टोबर २०१५ रोजी हा गुन्हा भिंगार कँप पोलिस ठाण्यात दाखल झाला. नागरदेवळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत आलमगीर भागातील सावतानगर येथे हे संबंधित स्वस्त धान्य दुकान आहे. या दुकानाची उपविभागीय अधिकारी वामन कदम नगरचे तहसीलदार सुधीर पाटील यांनी अचानक तपासणी केली असता, तेथे स्टॉक रजिस्टरनुसार गव्हाचा साठा २१.५० क्विंटलने कमी, तर तांदळाचा साठा ११.५० क्विंटलने अधिक आढळून आला. संबंधित गहू तांदूळ ‘एफसीआय’च्या (अन्न धान्य महामंडळ) तागाच्या गोण्यांतून काढून खासगी पांढऱ्या गोण्यांत भरण्याचे काम सुरू होते. हा माल काळ्याबाजारात विक्रीसाठी नेण्याचा हेतू स्पष्ट होत असल्याचे फिर्यादीतच म्हटले आहे. त्याबाबत नगर तालुक्याचे पुरवठा निरीक्षक क्रमांक एक राजेंद्र राऊत यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पुष्पा अनिल रुद्रवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा गहू तांदळाच्या अफरातफरीचा आहे.

हे सर्व असले, तरी यातील मेख वेगळीच आहे. मुळात हे स्वस्त धान्य दुकान क्रमांक ५४ एस. आर. काळपुंड (सुमती काळपुंड) यांच्या नावावर आहे. तशी नोंद जिल्हा पुरवठा विभागाच्या कार्यालयात आहे. मग गुन्हा पुष्पा रुद्रवार यांच्या नावाने नोंदवण्याचे कारण काय, याचा उलगडा होत नाही. गुन्हा नोंदवण्याच्या या घटनेला सात महिने झाले, तरी पोलिसांनी संबंधित वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी अद्याप शहानिशा का केली नाही, असे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणातून एकतर पोलिस या महसूल अधिकाऱ्यांची फसवणूक झाली आहे किंवा धान्याच्या अफरातफरीचा हा गुन्हा या अधिकाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही, असे स्पष्ट होते.

संपूर्णकुटुंबच ‘सराईत’
वरील प्रकरणातील साक्षीदार अशोक रुद्रवार यांच्याविरोधात एप्रिल २०१३ रोजी असाच स्वस्त धान्याच्या अफरातफरीचा गुन्हा दाखल झालेला आहे. एकूण चार आरोपी असलेल्या या गुन्ह्यात त्यांचा मुलगा मंगेश अशोक रुद्रवार हादेखील एक आरोपी आहे. त्यावेळी सचिन गणेश मेडेवार हा जावई पंच, तर दुसरा जावई दत्तात्रेय रामनाथ डुब्बेवार हा साक्षीदार असा हा सर्व प्रकार आहे. विशेष म्हणजे, या गुन्ह्याची फिर्याद दाखल होताना त्यात संबंधित ५४ क्रमांकाच्या दुकानाचा उल्लेख ‘अशोक रुद्रवार यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या स्वस्त धान्य दुकानाच्या गाळ्यात’ असा करण्यात आला आहे. त्यानंतर मात्र २०१५ च्या गुन्ह्यात याच दुकानाची मालकी पुष्पा अनिल रुद्रवार यांच्या नावे दाखवण्याचा प्रकार घडला आहे. वास्तविक पाहता आजही हे दुकान एस. आर. काळपुंड (सुमती काळपुंड) यांच्याच नावावर आहे. म्हणजेच उपविभागीय अधिकारी वामन कदम तहसीलदार सुधीर पाटील यांची म्हणजेच पर्यायाने शासनाची फसवणूक करण्यात आली आहे.

यातील उल्लेखनीय बाब म्हणजे, सन २०१३ मधील टेम्पो वापरण्यात आला (एम एच १६ ७६६५), त्याच टेम्पोतून आजही केडगावच्या सरकारी गोदामातून धान्याची सर्रास वाहतूक केली जात आहे. वास्तविक पाहता सरकारी धान्य वितरणासाठी असणाऱ्या वाहनांना हिरवा रंग देण्यात येतो, परंतु या नियमातूनही या टेम्पोला वगळण्यात आल्याचे स्पष्ट होते. त्यावर संबंधित पुरवठा किंवा सरकारी गोदामातील अधिकारी अजिबात आक्षेप घेत नाहीत, हे विशेष आहे.

गुन्ह्यांचा ‘कौटुंबिक’ मामला
मुळात या स्वस्त धान्य दुकानाच्या खऱ्या मालक सुमती काळपुंड या कोणी वेगळ्या नसून यातील साक्षीदार अशोक रुद्रवार यांच्या पत्नी आहेत. सुमती काळपुंड हे त्यांचे माहेरचे नाव आहे. दुसरे साक्षीदार सुनील रुद्रवार हे सुमती काळपुंड यांचे दीर आहेत. म्हणजे गुन्ह्याचा हा सर्व कौटुंबिक मामला बनवण्यात आला. पत्नीच्या दुकानाबाबतच्या गुन्ह्यात पतीला साक्षीदार करण्याचा हा प्रकार सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या कारभार स्पष्ट करणारा आहे.
सरकारी धान्य वितरणासाठी असणाऱ्या वाहनांना हिरवा रंग देण्यात येतो. असा नियमानुसार रंगवलेला शेजारी या नियमातूनही वगळण्यात आलेला धान्याच्या काळ्याबाजाराचा गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचा टेम्पो.

कागदपत्रे पाहूनच बोलू
^संबंधित कारवाईनगरच्या तहसीलदारांनी केली होती. मला फक्त फिर्याद देण्यासाठी बोलावण्यात आले होते. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही तहसीलदारांच्या समोरच झाली होती. माझी यात अतिशय मर्यादित भूमिका होती. त्यामुळे दुकानदाराचे नाव बदलण्याच्या प्रकाराबाबत कागदपत्रे पाहिल्यावरच बोलता येईल.'' राजेंद्र राऊत, पुरवठानिरीक्षक क्रमांक १, नगर तालुका.