नगर-जीवनात यशस्वी बनण्यासाठी कोणत्याही कार्यात स्वत:ला झोकून देऊन काम करावे. त्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना हे अतिशय चांगले माध्यम आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी केले. बुरूडगाव रस्त्यावरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
यावेळी र्शीरामकृष्ण इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य गीता गिल्डा, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बाळासाहेब ससे, उपप्राचार्य डी. एल. सदाफळ आदी उपस्थित होते. प्राचार्य गिल्डा म्हणाल्या, यश मिळवणे हे कोणाच्या रंगावर, शरीरावर अवलंबून नसून आंतरिक शक्तीवर अवलंबून असते. विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षण घेऊन आपले उद्दिष्ट साध्य करावे. प्रत्येकाने स्वयंकौशल्य आत्मसात करावे.
प्राचार्य ससे यांनी संस्थेत राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची, तसेच विशेष शिबिरादरम्यान घेण्यात येणार्या कार्यक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, संस्थेतील कर्मचारी एस. एल. गवळी, आर. एस. कदम, ए. एम. जवणे, ए. एन. राऊत, ए. एस. वाघ, व्ही. ए. क्षीरसागर, आर. आर. चौधरी, एस. एल. सुरवाडे, आर. ए. कुलट, आर. पी. शिरसाठ, पी. एस. शिंदे, पी. बी. देशमुख, एस. पी. देशमुख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. व्ही. सूर्यवंशी यांनी केले, तर आभार पी. एन. बंडगर यांनी मानले.