आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chief Minister Devendra Fadnavis Very Soon Visit Nagar

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लवकरच नगर दौरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - ऑनलाइन सात-बारा रेकॉर्ड स्कॅनिंगचे लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार अभियानाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ऑनलाइन सात-बारा रेकॉर्ड स्कॅनिंगबरोबरच नवे पोलिस अधीक्षक कार्यालय, तसेच जिल्हा रुग्णालयातील परिचारिका वसतिगृहाचे फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. २६ जानेवारीला हा कार्यक्रम करण्याचे नियोजन सुरु असले, तरी अद्यापि तारीख निश्चित झालेली नाही, असे शिंदे यांनी सांगितले.