आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पंधरा कोटी’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राहुरी-नगर-पाथर्डीविधानसभा मतदारसंघातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पहिल्या टप्प्यात पंधरा कोटींचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिली.
कर्डिले यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पाथर्डी तालुक्यातील मिरी -शंकरवाडी रस्त्यासाठी कोटी ६३ लाख, नगर तालुक्यातील जेऊर-बहिरवाडी, ससेवाडी-पिंपळगाव-उजैनी रस्त्यासाठी कोटी ३७ लाख, माथा-उदरमल रस्त्यासाठी कोटी ४० लाख, दरेवाडी-मांडवे रस्त्यासाठी कोटी ७४ लाख, राहुरी तालुक्यातील ताहाराबाद ते रोकडेवाडी रस्त्यासाठी त्याचबरोबर दरडगाव या रस्त्यासाठी कोटी ४२ लाख, वडनेर निंभेरे ते आंधळे वस्ती या रस्त्यासाठी कोटी ९५ लाख असा निधी मंजूर झाला आहे. मंजूर झालेल्या निधीतून सर्व रस्त्याचे डांबरीकरण होणार असून, ते गावांशी जोडले जाणार आहेत. त्याचबरोबर जिल्हा नियोजन समितीमधून उदरमल येथे दहा लाख रुपये खर्च करून सामाजिक सभागृह बांधण्यात येणार आहे. उदरमल रस्त्याचे खडीकरण करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. दहा लाख रुपये खर्च करून या सर्व कामांचे भूमिपूजन लवकरच राज्याच्या ग्रामविकासमंत्री पकंजा मुंडे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळेच रस्त्यांसाठी हा निधी मिळू शकला, असे कर्डिले यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...