आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिक्कीचा अहवाल मॅनेज झाला : पिचड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मातीमिश्रित चिक्कीचा प्रयोगशाळा अहवाल मॅनेज झालेला आहे. ही चिक्की वाटता परत पाठवून द्या. मातीमिश्रित चिक्की त्या मंत्र्यांना खाऊ द्या, असा खरपूस समाचार माजी मंत्री मधुकर पिचड यांनी गुरुवारी राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रपरिषदेत घेतला. विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात चिक्कीसह भ्रष्टाचाराची इतर प्रकरणे मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे जलि्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, महापौर अभिषेक कळमकर, जलि्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, माजी जलि्हाध्यक्ष पांडुरंग अभंग आदी यावेळी उपस्थित होते. पिचड म्हणाले, चिक्कीच्या प्रश्नावर काँग्रेसला काय बोलायचे ते बोलू द्या, पण राष्ट्रवादी हा लढाऊ पक्ष आहे.
विधानसभेत कोण किती आक्रमक आहे ते आम्ही दाखवून देऊ. चिक्कीचा अहवाल चांगला आला तरी ती वाटू नये. पुरवठादार आघाडी सरकारच्याच काळातील आहे, याबद्दलच्या प्रश्नावर पिचड म्हणाले, आम्ही सत्तेत असताना चुकीचे केले. त्यावेळी आरोप झाले म्हणून जनतेने आम्हाला घरी पाठवले. आता नवीन नियोजन आखण्याऐवजी भाजप आमच्याच काळातील अंमलबजावणी करू लागला, तर जनता त्यांनाही घरी पाठवेल. केंद्राकडून आलेला निधी वाट्टेल तसा उधळणे योग्य आहे का? विधानसभेत आमचा पक्ष चिक्कीसह विविध प्रश्नांना वाचा फोडणार आहे.सरकारचा भ्रष्टाचारही आम्ही मांडणार असून त्यात अनेक प्रकरणे बाहेर येतील, असे पिचड म्हणाले.

८० टक्के साखर कारखाने बंद राहतील
साखरकारखान्यांची अवस्था बिकट झाली आहे. शेतक-यांच्या उसाला भाव देता येत नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने वेळोवेळी पॅकेज जाहीर केले, पण आजतागायत पैसे मिळाले नाहीत. ही परिस्थिती बदलली नाही, तर पुढील वर्षी ८० टक्के साखर कारखाने बंद राहतील. जे चालतील ते पंधराशेच्यावर भाव देऊ शकणार नाहीत, असे पिचड म्हणाले.