आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकलाकारांसाठी व्यासपीठ हवे : राजळे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिनिधी- नगर मुलांमध्ये कलागुण असतात. गरज असते ती त्यांच्या कलागुण सादर होण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची. या दृष्टिकोनातून कलादीप प्रतिष्ठानच्या सुजाता पायमोडे यांचा प्रदर्शनाचा उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष मोनिका राजळे यांनी केले.
सावेडीतील रावसाहेब पटवर्धन स्मारकात 26 ते 28 जानेवारीदरम्यान भरवण्यात आलेल्या कलारंग क्लासिकच्या चित्तरवाडी प्रदर्शनाचे उद्घाटन करताना राजळे बोलत होत्या. अशा प्रकारची जास्तीत जास्त प्रदर्शने भरवली जावीत. त्यासाठी शाळांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
स्नेहालयच्या एज्युकेशन को-ऑर्डिनेटर प्रमिला उबाळे यांनी प्रदर्शनातील कलाकृतींचे कौतुक करून अशा उपक्रमांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रास्ताविक सुजाता पायमोडे यांनी केले. प्रदर्शनात उत्कृष्ट कलाकृती सादर करणार्‍या मुलांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. मुंबई येथील ख्यातनाम व्हिज्युएलायझर व डिजिटल आर्टिस्ट नीलेश औटी यांनी काढलेली रांगोळी सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनली होती. प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी गर्दी केली होती.