आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याची तक्रार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू झाल्याची तक्रार करत नातेवाईकांनी सोमवारी सकाळी जिल्हा न्यायाधीशांसमोर कैफियत मांडली. एड्स रॅलीनिमित्त जिल्हा रुग्णालयात आलेल्या न्यायाधीश बी. यू. देबडवार, जिल्हा पोलिस अधीक्षक आर. डी. शिंदे यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचण्यात आला.
विकास नामदेव ससे (22, दरेवाडी, ता. नगर) या युवकाने 29 नोव्हेंबरला औषध समजून विष घेतले. त्याला तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शरीरातील विष बाहेर काढून त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यास सांगितले. मात्र, अतिदक्षता विभागात जागा नसल्याने त्याला दोन तास सर्वसाधारण कक्षात ठेवण्यात आले. दुसर्‍या दिवशी त्याची प्रकृती आणखी ढासळली. रविवारी सकाळी साडेनऊपर्यंत डॉक्टर उपलब्ध न झाल्याने तब्येत आणखी बिघडली. रुग्णाची तब्येत व्यवस्थित असल्याचे सांगत डॉक्टरांनी दुसर्‍या रुग्णालयात नेण्याची आवश्यकता नसल्याचा अभिप्राय नातेवाईकांना दिला. रविवारी दुपारी त्याला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. सोमवारी पहाटे विकासचा मृत्यू झाला.