आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थँक्यू काका ! मला गुंडांच्या तावडीतून सोडवल्याबद्दल..., पोलिस अधीक्षक डॉ. त्रिपाठीही झाले भावुक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - 'त्यांच्याकडे धारदार शस्त्र होते.. पैशांसाठी ठार मारतील, म्हणून मी आधी घाबरलो.. पहाटेपर्यंत तो आरोपी धारदार शस्त्र घेऊन पहारा देत होता.. तेव्हा मी आनंदऋषीजी यांचे नाव घेत होतो.. पण, थँक्यू काका! तुम्ही सगळे पोलिसकाका वेळेवर आले, म्हणून माझा जीव वाचला,' असे भावोदगार काढत सार्थक ऊर्फ यश राजेंद्र गुगळे याने नगर पोलिस दलाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. गेल्या आठवड्यात कुख्यात आरोपींनी अपहरण केलेल्या सार्थकची पोलिसांनी अवघ्या काही तासांतच सुखरूप सुटका केली. त्याबद्दल सार्थकने नुकतीच पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांची भेट घेऊन पोलिस दलाचे आभार मानले.

नेवासे पंचायत समितीचे सदस्य राजू गुगळे यांचा वर्षीय मुलगा सार्थक याचे सोनईतून (ता. नेवासे) २४ फेब्रुवारीला रात्री अपहरण झाले. नंतर गुगळे यांच्या मोबाइलवर अपहरणकर्त्यांनी कोटींची खंडणी मागितली. घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे फिरवली. अन् अवघ्या तासांच्या आत सार्थकची सुटका करत तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. हा थरारपट रात्रभर सुरू होता. एकुलता एक मुलगा सुखरूप परतल्यामुळे पंचायत समिती सदस्य गुगळे कुटुंबीयांचा, तसेच पोलिसांचाही जीव भांड्यात पडला. आपला जीव वाचवणाऱ्या पोलिसांना भेटून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सार्थक नगरला आला होता. सार्थक त्याचे वडील राजेंद्र गुगळे यांच्यासह सोनई ग्रामस्थांनी पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे यांच्यासह तपास पथकात सहभागी झालेल्या सर्व पोलिसांची प्रत्यक्ष भेट घेतली. पुष्पगुच्छ पेढे देऊन सार्थकने सर्वांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली. त्याच्या या कृत्याने पोलिस अधिकारी कर्मचारीही भारावले. यावेळी शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले, घोडेगावचे महावीर नहार आदींसह सोनईचे व्यापारी उपस्थित होते.
छायाचित्र :पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांचा सत्कार करताना सार्थक गुगळे. समवेत राजेंद्र गुगळे, अनिल दरंदले, महावीर नहार.