आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चाइल्ड लाइनने पुन्हा रोखला तिचा बालविवाह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कोपरगाव येथील 17 वर्षांच्या मुलीचा बालविवाह चाइल्ड लाइनमुळे दुसºयांदा रोखला गेला. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथेही एक बालविवाह रोखण्यात चाइल्ड लाइनला रविवारी यश आले.

कोपरगाव येथील अल्पवयीन मुलीला वडील नसल्यामुळे ती मामांकडे राहत होती. काही महिन्यांपूर्वी त्यांनी बळजबरीने तिचा विवाह लावून देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती नगरला पळून आली होती. चाइल्ड लाइनच्या संपर्कात आल्यानंतर तिला महिला बालकल्याण समितीमार्फत पुण्यातील महिलाश्रमात ठेवण्यात आले. दहावीची परीक्षा झाल्यानंतर ती सुटीत मामांकडे आली होती. रविवारी तिच्या मामाने पुन्हा विवाहाचा घाट रचला. त्याची कुणकुण लागल्याने चाइल्ड लाइनचे समन्वयक कुंदन पठारे, संगीता शेलार व शाहीद शेख यांनी कोपरगाव गाठले. पोलिसांच्या मदतीने हा बालविवाह रोखण्यात आला. पोलिसांनी तिच्या मामांना समज देत त्यांच्याकडून माफीनामा लिहून घेतला. नंतर मामाने मुलीचा सांभाळ करणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे पोलिसांच्या परवानगीने चाइल्ड लाइनने मुलीला नगरला आणले. बालकल्याण समितीच्या मार्गदर्शनानुसार तिला बाल सुधारगृहात ठेवण्यात आले. गेल्या काही दिवसांत सहा बालविवाह रोखले, अशी माहिती पठारेंनी दिली.