आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘संजीवनी’च्या सहा विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींसमवेत साजरा केला बाल दिन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव- संजीवनी अॅकेडमीच्या सहा विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांसह राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन बालदिन साजरा केला. हा बहुमान महाराष्ट्रातील फक्त चार शाळांना मिळाला. त्यात जिल्ह्यातून संजीवनी अकॅडमीचा समावेश होता, अशी माहिती संजीवनी अकॅडमी या स्कूलच्या संचालिका मनाली कोल्हे यांनी दिली. 


कोल्हे म्हणाल्या, राष्ट्रपतींबरोबर बालदिन साजरा करण्याच्या संधीसाठी स्कूलने प्रस्ताव सादर केला होता. त्यात स्कूलच्या उपलब्धींबाबत पुराव्यांसह माहिती पाठवली होती. राष्ट्रपती कार्यालयाने देशातील ११२ शाळांना दिल्लीला येण्याची परवानगी दिली. त्यात महाराष्ट्रातील फक्त चार शाळांचा समावेश होता. परवानगी मिळाल्यानंतर १२ वर्षे आतील वयोगटातील सहा सर्वत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यात आदित्य बरवंट, चौथीची चार्वी कोठारी, पाचवीची विद्यार्थिनी धनश्री देवकर, सहावीतील अथर्व जगताप, सातवीतील अंजली कर्वा आणिा ितसरीतील साईश आढाव या गुणवंतांचा समावेश होता. त्यांच्यासोबत स्वाती भास्कर विरूपक्ष रेड्डी हे शिक्षक होते. राष्ट्रपती कोविंद यांना विद्यार्थ्यांनी साईबाबांची प्रतिमा भेट दिली. त्यांनी बालदिनाच्या शुभेच्छाही दिल्या शिकून खूप मोठे व्हा, असा आशीर्वाद दिला. या विद्यार्थ्यांचे राष्ट्रपती भवनात दोन तास वास्तव्य होते. 

बातम्या आणखी आहेत...