आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंटू आल्हाट खूनप्रकरणी आरोपींना पोलिस कोठडी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- नागरदेवळेचा उपसरपंच चिंटू आल्हाट खूनप्रकरणी चार आरोपींना मुख्य न्यायदंडाधिकारी एस. टी. भालेराव यांनी शनिवारी 30 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी दिली. या आरोपी शुक्रवारी स्वत:हून तोफखाना पोलिसांसमोर हजर झाले आहेत.

अमोल दीपक छजलानी, विशाल गोपाल गोहेर, विश्वास गोपाल गोहेर व संदीप जगदीश झांजोट अशी कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. चिंटू आल्हाटचा 6 एप्रिलला दुपारी जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारात दगड व काठय़ांनी हल्ला करून खून करण्यात आला, तर त्याचे दोन साथीदार गंभीर जखमी झाले. घटनेनंतर आरोपी र्शीरामपूरमार्गे मध्यप्रदेशात पळून गेले. गेल्या पंधरा दिवसांपासून पोलिस त्यांच्या मागावर होते. मात्र, आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. शुक्रवारी सायंकाळी यातील चार आरोपी स्वत:हून तोफखाना पोलिसांसमोर हजर झाले. त्यांना शनिवारी मुख्य न्यायदंडाधिकारी भालेराव यांच्यासमोर हजर करण्यात आले. आरोपींना चौदा दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकार पक्षाच्या वतीने अँड. रजनी देशपांडे यांनी केली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आरोपींना दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

दिनेश परशुराम कलुशिया, धीरज संजस मुट्ट, धरम बलदेव छजलानी, मनोज चव्हाणसह इतर आठ ते दहा आरोपीं अजूनही या गुन्ह्यात फरार आहेत. भिंगार परिसरातील चिंटूच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा कारणावरून हा खून झाल्याची फिर्याद देण्यात आली आहे. मात्र, खुनामागे वेगळेच कारण असल्याची चर्चा आहे. अटकेतील आरोपींच्या तपासातून या बाबींवर प्रकाश पडणार आहे.