आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईस्ट चर्चचा उद्या १५७ वा वर्षपूर्ती सोहळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भिंगार येथील क्राईस्ट चर्चची ऐतिहासिक वास्तू. छाया: कल्पक हतवळणे . - Divya Marathi
भिंगार येथील क्राईस्ट चर्चची ऐतिहासिक वास्तू. छाया: कल्पक हतवळणे .
नगर- भिंगारयेथील क्राईस्ट चर्च शुक्रवारी (७ ऑगस्ट) १५७ वा वर्षपूर्ती सोहळा साजरा करत आहे. यानिमित्त विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे या ऐतिहासिक वास्तूला या दिवशी सदिच्छा भेट देणार आहेत.
ब्रिटिश काळात भिंगार नाल्याशेजारी उभारण्यात आलेली क्राईस्ट चर्चची वास्तू वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रारंभी या चर्चचा उपयोग लष्करी अधिकारी जवानांसाठीच होत असे. नंतर या चर्चची धुरा भारतीय मिशनरींकडे सोपवण्यात आली. केवळ आध्यात्मिकच नव्हे, तर सामाजिक कार्यातही या चर्चने मोठे योगदान दिले आहे. अनाथाश्रम, वृद्धाश्रम, अंधांसाठी काम करणारी संस्था, सामाजिक संस्था या माध्यमातून चर्चने गोरगरीब दीनदलितांसाठी योगदान दिले आहे.

चर्चमध्ये दर रविवारी उपासना होते. तरुणांचे उद््बोधन वर्ग चालवले जातात. महिला मंडळाच्या सभा होतात. मुलांसाठी संडे स्कूल चालवले जाते. मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित केली जातात. खेळ, स्पर्धा, सहली, विविध संस्थांना भेटी, तसेच घरोघरी प्रार्थना सभांचे आयोजन चर्चच्या वतीने केले जाते. चर्चमार्फत सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते.

वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी पालकमंत्री राम शिंदे या ऐतिहासिक चर्चला भेट देणार आहेत. सायंकाळी वाजता प्रार्थना आयोजित करण्यात आली आहे.

अखंड सेवेचे व्रत
प्रभूयेशू ख्रिस्त या जगात सेवा करून घ्यावयास नव्हे, तर सेवा देण्यास आला. हेच सेवेचे व्रत क्राईस्ट चर्चने आजवर घेतले आहे. चर्चच्या स्थापना दिनानिमित्त पुन्हा एकदा या कार्याला उजाळा देऊन समाजाप्रती आपली निष्ठा, बांधिलकी ध्येय दृढ करण्याचा प्रयत्न केला जाईल. केवळ नगर जिल्ह्यालाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावे, असे क्राईस्ट चर्चचे कार्य आहे.''
सुनील भिंगारदिवे.
ऐतिहासिक वारसा
बातम्या आणखी आहेत...