आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेव्ह. ना. वा. टिळक यांना अभिवादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- आधुनिक मराठी कवितेचा पाया रचणा-या कवी पंचकातील फुला-मुलांचे कवी व मराठी ख्रिस्ती समाजाचे संतकवी रेव्ह. ना. वा. टिळक यांची 153 वी जयंती मराठी ख्रिस्ती साहित्य परिषद, नाशिक धर्म प्रांत, महाराष्ट्र सिनड, ख्रिश्चन सोशल केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली.
सिद्धार्थनगर येथील स्मशानभूमितील टिळक यांच्या स्मृतिस्थळी पुष्पांजली अर्पण करून, त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी नाशिक धर्म प्रांताचे पी. एल. कांबळे, मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष रॉबर्ट निकाळजे, रवींद्र ठोंबरे, राजू देठे, सतीश जाधव, अ‍ॅड. विनायक पंडित, डी. बी. कसोटे, अनिल भालेराव, प्रसन्ना शिंदे, डी. डी. सोनवणे, रेव्ह. अनिल वंजारे आदी उपस्थित होते. निकाळजे म्हणाले, टिळक हे कुशाग्र बुध्दिमत्तेचे विद्वान पंडित होते.