आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : नाताळच्या रंगात रंगले अवघे नगर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - ख्रिस्ती बांधवांसह सर्वांचे आकर्षण असलेला नाताळचा सण बुधवारी मोठय़ा उत्साहात साजरा होत आहे. नगर शहर व भिंगारमधील सर्व चर्चची रंगरंगोटी करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ह्यूम मेमोरियल चर्च, तारकपूर परिसरातील सेंट सेव्हियर्स कॅथेड्रल, भिंगारमधील सेंट जॉन चर्चसह सर्व चर्चमध्ये मंगळवारी नाताळची तयारी सुरू होती.

येशू ख्रिस्ताचा जन्मदिन असलेला नाताळचा सण मोठय़ा उत्साहात शहरात साजरा केला जातो. नाताळानिमित्त ख्रिस्ती बांधव एकमेकांना भेटून शुभेच्छा, भेटवस्तू देतात. नाताळनिमित्त यंदा विविध धार्मिक व करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

चर्चमध्ये येशूचा जन्मोत्सव, मुलांना खाऊवाटप, सामुदायिक बाप्तिस्मा विधी, कॅण्डल लाइट सर्व्हिस, तसेच पवित्र सहभागिता विधी, नाताळची महाउपासना, विभागवार सामूहिक धार्मिक कार्यक्रम, युवकांसाठी कार्यक्रम, स्तुती आराधना, धार्मिक गीतांचा कार्यक्रम, पवित्र दृढीकरण विधी, आनंद मेळा, सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक प्रवचने, क्रीडा महोत्सव, प्रार्थना आदी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

भिंगार उपनगरात मंगळवारी रात्री दहा वाजता कार्यक्रम सुरू झाले. येशूच्या स्तुतीची गीते म्हणण्यात आली. मध्यरात्री येशूच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पवित्र मिस्सा बलिदानाचा विधी झाला. चर्चच्या प्रमुख धर्मगुरुंनी उपस्थित भाविकांना उपदेश केला. बुधवारी (25 डिसेंबर) नाताळाचा सण उत्साहात साजरा केला जाईल. गुरुवारी आणि शुक्रवारी ‘ख्रिसमस ट्री’वर सजावट करून आनंदोत्सव साजरा केला जाईल. चर्चमध्ये प्रार्थना होणार आहेत. या सर्व कार्यक्रमातील शहरातील ख्रिस्ती बांधव मोठय़ा संख्येने सहभागी होणार आहेत.