आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंधरा लाखांच्या सिगारेट चोरट्यांनी लांबवले, चालत्या वाहनातून चोरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी- रांजणगावहून परळीकडे सिगारेट अन्य माल घेऊन निघालेल्या टेम्पोमधून १५ लाख किमतीचे सिगारेटचे १७ बाॅक्स चोरट्यांनी लांबवले. चालत्या वाहनातून चोरी करण्याचा फंडा चोरट्यांनी अवलंबल्याने पोलिसही चक्रावले.

चालक दीपक राख यांनी पोलिसांना सांगितले, सोमवारी (१८ जानेवारी) रात्री दहाच्या सुमारास एमएच-१२, एफझेड-६४०० हा शिवराज ट्रान्सपोर्टचा टेम्पो (कारेगाव, पुणे) रांजणगाव एमआयडीसीतून सिगारेट, नुडल्स, बिस्किटे, चॉकलेट, आटा असा माल घेऊन निघाला. पावणेअकराच्या सुमारास सुपा टोलनाक्याजवळील पेट्राेलपंपावर विश्रांतीसाठी चालक थांबला. पहाटे साडेतीनच्या सुमारास टेम्पो परळीकडे निघाला. नगर, भिंगार, पाथर्डीमार्गे जाण्यासाठी करंजी घाट उतरून गावात हॉटेलवर चहा पिण्यासाठी चालक थांबला. खाली उतरल्यावर ताडपत्रीच्या दोऱ्या ताडपत्री कापलेली दिसली. पाहणी केली असता गाडीतील सिगारेटचे १७ बॉक्स गायब झालेले दिसले. राख यांनी मालकाला फोन लावला. त्यांनी माघारी बोलावले. करंजी घाटात रस्त्यावर सिगारेटची पाकिटे पडलेली दिसली. गाडी थांबवून राख यांनी पोलिसांना कळवले. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिस स्टेशनला अधिकृतपणे माहिती उपलब्ध नव्हती.
सुपा येथील पेट्रोलपंपावर सुरक्षा रक्षक तैनात असून तेथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टेम्पो सुस्थितीत असल्याचे दिसले. सुपा टोलनाक्यावरील फुटेजमध्येही गाडीत काहीही आक्षेपार्ह घटना आढळली नाही. त्यामुळे पोलिस चक्रावले आहेत.

याच टेम्पोमधून चोरट्यांनी १५ लाख रूपये किमतीची सिगारेटची पाकिटे लांबवली. हा टेम्पो पाथर्डी पोलिस ठाण्यात सध्या उभा आहे.