आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडलाधिकाऱ्यासह दोघांना सक्तमजुरीची शिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - लाचलुचपत प्रकरणात दोषी ठरवून राहात्याच्या मंडलाधिकाऱ्यासह एका खासगी व्यक्तीला न्यायालयाने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. संजय भगवान रासने असे मंडलाधिकाऱ्याचे, तर अनिल बाबुराव गरुड (सोनारी, ता. राहाता) अशी शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. कोपरगाव येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एम. वाय. शेख यांनी हा निकाल सुनावला. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अशोक वहाडणे यांनी काम पाहिले.
राहाता तालुक्यातील एकरुखे येथील दादा गबाजी वाटेकर यांच्या सासूच्या मृत्यूपत्राप्रमाणे त्यांच्या पत्नीच्या नावावर जमिनीची नोंद लावायची होती. याविषयीचे फेरफार मंजूर करण्यासाठी मंडलाधिकारी रासने याने अनिल गरुड याच्यामार्फत फेब्रुवारी २०१४ रोजी हजारांची लाच स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन उपअधीक्षक अशोक देवरे यांनी सापळा रचून दोघांना रंगेहात पकडले. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन कोपरगाव येथील न्यायालयात दोषारोपपत्र सादर झाले होते.

या खटल्यात साक्षीपुरावे सादर होऊन त्यानुसार न्यायालयाने रासने गरुड यांना दोषी ठरवले. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांन्वये रासने याला वर्षे सक्तमजुरी, एकूण हजार रुपये दंड दंड भरल्यास महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली. अनिल गरुड यालाही त्याच कायद्यान्वये वर्षे सक्तमजुरी हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये एवढ्या कमी वेळेत न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊन आरोपींना शिक्षा होण्याची ही दुर्मिळ घटना आहे.
बातम्या आणखी आहेत...