आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावेडीतील नागरिकांची

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आधार नोंदणीसाठी सावेडीतील तहसील कार्यालयासमोरील सेतू केंद्राबाहेर लागलेली नागरिकांची रांग. छाया: कल्पक हतवळणे. - Divya Marathi
आधार नोंदणीसाठी सावेडीतील तहसील कार्यालयासमोरील सेतू केंद्राबाहेर लागलेली नागरिकांची रांग. छाया: कल्पक हतवळणे.
नगर- सुमारे दोन लाख लोकसंख्या असलेल्या सावेडी परिसरात आधार कार्डासाठी अवघी पाच नोंदणी केंद्रे असल्याने सावेडीकरांना आधार कार्ड काढण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे.
केंद्र सरकारने २०१० मध्ये टेंभली (जि. नंदुरबार) येथे तेव्हाचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्ते आधार कार्ड योजनेला सुरुवात केली. आता चार वर्षे झाली, तरी लाखो नागरिक अजूनही आधार कार्डपासून वंचित आहेत. गॅस सिलिंडरचे अनुदान, राजीव गांधी जीवनदायी योजना यासह अन्य योजनांसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. शाळा महाविद्यालयांमध्ये शिष्यवृत्तीसाठीही आधार कार्ड आवश्यक झाले आहे. मात्र, आधार नोंदणीसाठी सुरू करण्यात आलेल्या केंद्रांची संख्या अपुरी असल्यामुळे नागरिकांना आधार केंद्रावर ताटकळत उभे रहावे लागते. संख्या कमी असल्यामुळे अनेकदा नागरिकांचे आधार कार्ड केंद्रातील कर्मचाऱ्यांचे वाद होतात. आधार नोंदणी मोफत असली, तरी आधार कार्ड काढल्यानंतर त्याचे लॅमिनेशन करण्यासाठी पैसे घेतले जातात.

नगर जिल्ह्यात ५० हून अधिक आधार नोंदणी केंद्र आहेत. नगर शहरात १२ आधार नोंदणी केंद्रे आहेत. शिवाय खासगी महासेतू कार्यालयांतही आधार कार्डची नोंदणी केली जाते. नगर शहरात आधार नोंदणी विक्रमी झाली आहे. सुमारे अडीच लाखांहून अधिक नागरिकांनी आधार कार्डची नोंदणी केली आहे.

नगर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे. शहरातील विकसनशील भाग म्हणून आेळखल्या जाणाऱ्या सावेडी भागाची लोकसंख्या सुमारे दोन लाख आहे. सावेडीनाका, प्रेमदान चौक, पत्रकार चौक, सिंधी कॉलनी, पाइपलाइन रोड, भिस्तबागनाका, प्रोफेसर कॉलनी, कुष्ठधाम रस्ता या भागातील नागरिकांसाठी अवघी पाच आधार कार्ड नोंदणी केंद्रे आहेत. लोकसंख्या जास्त आधार नोंदणी केंद्र कमी अशी परिस्थिती असल्यामुळे या पाच केंद्रांवर सकाळपासून नागरिकांची गर्दी असते. नोंदणीसाठी नागरिकांना तासन्् तास् केंद्रासमोर उभे रहावे लागते. या केंद्रावर सावेडी भागातीलच नाही, तर नगर तालुक्यातील विविध गावांमधून आलेले नागरिकही आधार नोंदणीसाठी गर्दी करतात. त्यामुळे अनेकदा गोंधळ निर्माण होतो.

शाळेने आधारकार्ड काढावे
शाळांनी मुलांना आधार कार्ड सक्तीचे केले आहे. नोंदणी केंद्रावर मोठी गर्दी असते. त्यामुळे अनेक चकरा मारूनही आधार कार्डची नोंदणी करता आलेली नाही. त्यामुळे शाळांनीच आधार कार्ड नोंदणीचे यंत्र आणून मुलांच्या नावांची नोंदणी करावी.'' शेखजमीर, नागरिक.

संकेतस्थळावर अजून पूर्वीच्या आयुक्तांचेच नाव
राज्यशासनाच्या आधार कार्ड नावाच्या संकेतस्थळावर नगर शहराचे नोडल अधिकारी म्हणून महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संजय काकडे यांचे नाव आहे. काकडे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्याजागी आयुक्त म्हणून विजय कुलकर्णी आले. त्यांचीही दोन आठवड्यांपूर्वी बदली झाली. त्यांच्याजागी विलास ढगे हे नवे आयुक्त आले, तरीदेखील नोडल अधिकारी म्हणून पूर्वीचे आयुक्त संजय काकडे यांचेच नाव आहे.

केंद्रांची संख्या वाढवा
शासनएकीकडे आधार कार्डची सक्ती करत असताना दुसरीकडे मात्र आधार कार्ड नोंदणी केंद्रांची संख्या अपुरी आहेत. सावेडी भागात लोकसंख्येच्या मानाने जास्त केंद्र असणे आवश्यक आहे. या भागात आणखी १० आधार कार्ड नोंदणी केंद्रे सुरू करावीत.'' विकासशिंदे, नागरिक.
बातम्या आणखी आहेत...