आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद पडलेली शहर बससेवा पुन्हा सुरू - राजकीय हेतूने विरोधकांनीच एएमटी पाडली होती बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मागील दोन महिन्‍यापासून बंद पडलेली शहर बससेवा (एएमटी) सुरू करण्यास सत्ताधाऱ्यांना अखेर यश आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून रविवारी सकाळी बससेवेला पुन्हा सुरुवात झाली. विरोधकांच्या राजकीय भांडवलामुळेच बससेवा बंद पडली होती, अशी टीका या वेळी महापौर संग्राम जगताप यांनी केली. सोमवारपासून शहरात पाच बस धावणार असून उर्वरित दहा अत्याधुनिक बस येत्या तीन आठवड्यांत उपलब्ध होणार आहेत.
आमदार अरुण जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादा कळमकर, माजी आमदार साहेबराव दरेकर, शंकरराव घुले, आयुक्त विजय कुलकर्णी, स्थायी समितीचे सभापती किशोर डागवाले, उद्योजक चंद्रकांत गाडे, घनश्याम गाडे, महिला व बालकल्याणच्या उपसभापती कलावती शेळके, नगरसेवक समद खान, अजिंक्य बोरकर, आरिफ शेख, बाळासाहेब बोराटे आदी उपस्थित होते. महापौर जगताप म्हणाले, विरोधक विविध विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी खटाटोप करत आहेत. कोठी रस्त्याप्रमाणेच त्यांनी आता बससेवेचा पुन्हा शुभारंभ केला तरी चालेल. शविसेनेच्या सर्व नगरसेवकांनी चौकाचौकांत उभे राहून बससेवेचे स्वागत केले, तरी आमचे काहीच म्हणणे नाही. कारण नागरिकांना माहिती आहे की, बससेवेचे बाळही आमचेच आहे व त्याचे बारसेही आम्हीच केले. बससेवा सुरू करण्यासाठी कोणताच ठेकेदार तयार नव्हता. आम्ही प्रयत्न केल्यामुळेच धनंजय गाडे सेवा सुरू करण्यासाठी तयार झाले. शविसेनेने मात्र त्यास विरोध केला. मनपा तोट्यात असतानाही शविसेनेने मागील ठेकेदारास नुकसान भरपाईपोटी मनमानी पध्दतीने पैसे दिले. आम्ही हे पैसे देण्यास विरोध केल्यामुळे बससेवा बंद झाली. आम्ही आता जनतेच्या खिशावर जास्त ताण पडू न देता बससेवा पुन्हा सुरू केली असल्याचे जगताप यांनी सांगितले..

कळमकर म्हणाले, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, कामगार यांच्यासाठी बससेवा गरजेची आहे. शहराच्या आमदाराने विकासाच्या दृष्टीने कोणतेच भरीव काम केले नाही. आमदार अभ्यास न करता केवळ मोर्चे-आंदोलने करतात. बससेवेबाबतही त्यांनी तेच केले. चंद्रकांत गाडे म्हणाले, यशवंत ऑटोच्या माध्यमातून बससेवा सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा देऊन सेवा बंद होणार नाही, याची काळजी घेणार त्यांनी सांगितले..

आमदारांनी खुशाल उद्घाटने करावीत...
नगरोत्थान अिभयानांतर्गत सुरू असलेले रस्ते व वदि्युतीकरणाची कामे आमच्याच कार्यकाळात मंजूर झाली आहेत. आम्ही केवळ औपचािरकता म्हणून या कामांची उद्घाटने केली. आमदार मात्र नागरिकांची दशिाभूल करून श्रेय लाटण्याचा खटाटोप करत आहेत. आम्ही केलेल्या कामांचे त्यांनी खुशाल उद्घाटन करावे, आमचे काहीच म्हणणे नाही, असा टोला महापौर जगताप यांनी पत्रकार परिषदेत मारला.

यश पॅलेस ते चाणक्य हॉटेलपर्यंतच्या पहलि्या टप्प्यातील रस्त्याचे सत्ताधाऱ्यांनी शनविारी (२३ ऑगस्ट) सायंकाळी लोकार्पण केले. आम्ही पाठपुरावा केल्यामुळेच हे काम मार्गी लागले. आघाडीचे सत्ताधारी आमच्या बाळाचे बारसे घालत आहेत. त्यामुळे यश पॅलेस ते चाणक्य हॉटेलपर्यंतच्या रस्त्याचे आम्ही पुन्हा उटन करणार असल्याचे आमदार अनलि राठोड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. या पार्श्वभूमीवर जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन नगरोत्थान अिभयानांतर्गत सुरू असलेली कामे आघाडीच्या कार्यकाळात मंजूर झाली असल्याचे पुराव्यासह सांगितले.. आम्ही पाठपुरावा केल्यामुळेच सुमारे ७० कोटींची कामे २०११ मध्ये मंजूर झाली, असे त्यांनी सांगितले.

आमच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या अनेक कामांचे त्यांनी भूमिपूजन केले, परंतु आम्ही काहीच बोललो नाही. आता मात्र आमच्या कामाचे आम्ही उद्घाटन करत असतानाही ते श्रेय लाटण्यासाठी पुढे येत आहेत. आम्हाला केवळ विकासकामांशी घेणे आहे. त्यामुळे आम्ही केलेल्या कामांचे त्यांनी खुशाल उद्घाटने करावीत. त्यांनी यश पॅलेस ते चाणक्य रस्तावर तीन िठकाणी उद्घाटने केलीत तरी चालेल. आम्ही महात्मा फुले चौकात उपोषण सुरू केल्यानंतर कोठी रस्त्याच्या कामास कार्यारंभ आदेश देण्यात आला. आमच्या कार्यकाळात आम्ही रस्त्याच्या कामाला गती दिली. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पहलि्या टप्प्यातील काम तातडीने काम पूर्ण केले, असे जगताप म्हणाले.

कोठी रस्त्याप्रमाणेच केडगाव देवी व बालिकाश्रम रस्त्याचे कामही प्रगतिपथावर आहे. सुमारे २६६ कोटी रुपयांची भुयारी गटार योजनाही आता मंजूर झाली आहे. या योजनेमुळे भविष्यात मोठी भर पडणार असल्याचे यावेळी जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले..
अडीच वर्षे काय केले?
युतीकडे अडीच वर्षे महापालिकेची सत्ता होती, परंतु या अडीच वर्षांत त्यांनी काहीच केले नाही. साधी शहर सुधारित पाणी योजनाही (फेज टू) त्यांना पूर्ण करता आली नाही. अडीच वर्षे हा मोठा कालावधी होता. या कालावधीत फेज टू योजना पूर्ण झाली असती, तर शहरातील नागरिकांवर आता दूषित पाणी पिण्याची वेळ आलीच नसती. त्यांनी केवळ कार्यारंभ आदेश दिले, भूमिपूजन करून दिशाभूल केली. प्रत्यक्ष कामांवर भर दिला असता, तर आतापर्यंत फेज टूचे स्वच्छ पाणी मिळाले असते, परंतु आमदारासह शविसेनेचे नगरसेवक दूषित पाण्याचे खापर आमच्यावर फोडत आहेत. तक्रारी येताच आम्ही तातडीने उपाययोजना केल्या. शविसेनेने मात्र त्याचेही राजकारण केले. आम्हाला कोणत्याही विकासकामाचे श्रेय नको. आम्हाला केवळ नागरिकांना चांगल्या सुविधा द्यायच्या आहेत, असे महापौर जगताप यांनी स्पष्ट केले.