आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीओकडून परवानगी; "एएमटी'चा मार्ग मोकळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शहर बससेवा (एएमटी) सुरू करण्यासाठी आरटीओ कार्यालयाने परवानगी दिल्याने अडथळ्यांची शर्यत संपली आहे. लवकरच शहर बससेवा सुरू होईल. तथापि, आरटीओ कार्यालयाने ट्रव्हलसाठी असलेल्या दंडाची कार्यपद्धती शहर बस सेवेसाठी वापरून परवाना असतानाही दंड वसूल केल्याचा आरोप होत असल्याने नवा वाद उभा राहणार आहे.
दहा प्रवासी बसच्या मालकी हस्तांतरणासाठी १६ डिसेंबरला आरटीओ कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रकरणात वाहनांना कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने २ डिसेंबर २०१४ रोजी ना-हरकत प्रमाणपत्र दिले होते. १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ या कालावधीत टप्पा वाहतूक परवान्यासाठी ७१ रुपये प्रतिप्रवासी प्रतिवर्षप्रमाणे कर वसूल करण्यात आला आहे. १६ डिसेंबरला यादीतील वाहनांना कंत्राटी वाहतूक परवाना जारी करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला . त्यामुळे या वाहनांना महाराष्ट्र मोटार वाहन कर कायदा कलम ३ प्रमाणे प्रतिप्रवासी प्रतिवर्ष १ हजार ९०० रुपये कराचा दर आहे. टप्पा वाहतूक परवाना कराचे दर व कंत्राटी वाहतूक परवाना दरातील डिसेंबरसाठी कर फरकाची रक्कम भरून मालकी हस्तांतरणासाठी अभिलेख व नोंदी आरटीओ कार्यालयात सादर करण्याचे पत्र आरटीओ कार्यालयाने यशवंत ऑटो प्रायव्हेट लिमिटेड संस्थेला दिले आहे. त्यानुसार संस्थेने दहा बससाठी ७५ हजार ३५० रुपये कराचा भरणा केला आहे. त्यामुळे लवकरच एएमटी सेवा सुरू होऊ शकेल.