आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात आजपासून धावणार २१ बसेस, अभिकर्ता संस्थेचे संचालक धनंजय गाडे यांची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगरकरांच्या सेवेसाठी आता पूर्वीच्या दहा नवीन ११ अशा २१ शहर बस धावणार आहेत. रविवारी दुपारपासून ही सेवा सुरू होणार आहे. मागील सहा महिन्यांपासून अविरतपणे नगरकरांच्या सेवेत असलेली ही सेवा आता बसची संख्या वाढल्याने अधिक सोयीस्कर होणार आहे. संख्या वाढल्याने बसच्या प्रवासी फेऱ्या वाढणार आहेत. त्यामुळे नगरकरांचा प्रवास अधिक सुखद होणार आहे, अशी माहिती अभिकर्ता संस्थेचे संचालक धनंजय गाडे यांनी शनिवारी दिली.

नगरकरांसाठी जानेवारीपासून शहर बससेवा सुरू झाली. विद्यार्थी, पालक, नोकरदार, ज्येष्ठ नागरिकांसह संपूर्ण शहर उपनगरातील नागरिकांना या बससेवेमुळे मोठा दिलासा मिळाला. अभिकर्ता संस्था यशवंत ऑटोने सुरुवातीला दहा बसेस सुरू केल्या. परंतु प्रवाशांची संख्या पाहता या बस कमी पडत होत्या. त्यामुळे अभिकर्ता संस्थेने करारनाम्यानुसार आणखी ११ बस खरेदी केल्या आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, त्यासाठी त्यांना हव्या त्या वेळेत बससेवा उपलब्ध होणार आहे. शाळा-महाविद्यालये सुरू झाल्याने आहे ती बससेवा कमी पडत होती. परंतु आता २१ बसेस धावणार असल्याने विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक, तसेच नोकरदारांचाही प्रश्न सुटणार आहे. विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पासेसही देण्यात येत आहेत.
पर्यटनप्रेमींसाठी नगरदर्शन उपक्रमही लवकरच सुरू करणार असल्याचे गाडे यांनी सांगितले. राबवण्यात येणार आहे. नगरकरांनी बससेवेला प्रतिसाद दिल्याने आणखी बस खरेदी करण्याचा निर्णय अभिकर्ता संस्थेने घेतला होता. त्यानुसार ११ बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. त्या रविवारी दुपारपासून प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू होतील. यापूर्वीची अभिकर्ता संस्था प्रसन्ना पर्पलने महापालिका प्रवाशांना वेठीस धरत बससेवा बंद केली होती. तेव्हापासून शहरातील अनधिकृत रिक्षाचालकांनी प्रवाशांची आर्थिक लूट केली होती. त्यामुळे हजारो सर्वसामान्य प्रवाशांचे महिन्याचे आर्थिक नियोजन कोलमडले. बंद झालेली ही सेवा पुन्हा नव्याने सुरू झाली. आता नगरकरांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी अभिकर्ता संस्था प्रयत्न करत आहे. नवीन ११ बस खरेदी केल्याने प्रवासी फेऱ्या, तर वाढणारच आहेत, शिवाय ज्या भागात बस जात नव्हती, तेथे बससेवा सुरू होणार आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.

चांगली सेवा हाच उद्देश
अनेकअडचणींना तोंड देत शहर बससेवा सुरू केली. नगरकरांसाठी एएमटी अत्यावश्यक आहे. प्रवाशांना सुरक्षित चांगली सेवा देणे, हाच एकमेव उद्देश आहे. त्यासाठी महापालिका जिल्हा प्रशासनाने शहरातील अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवले पाहिजे. आता २१ बस धावणार असल्याने प्रवाशांच्या समस्या सुटतील.'' धनंजयगाडे, संचालक,यशवंत ऑटो अभिकर्ता संस्था.