Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | civil-hospital-10-doctors-post-

सिव्हिलमध्ये 10 डॉक्टरांची पदे रिक्त

प्रतिनिधी | Update - Oct 19, 2011, 07:54 AM IST

जिल्हा रुग्णालयासह 25 ग्रामीण रुग्णालयांतील 37 डॉक्टरांच्या जागा रिक्त असल्याने आरोग्य विभागाच्या डॉक्टरांवरील कामचा बोजा वाढला आहे.

  • civil-hospital-10-doctors-post-

    नगर - जिल्हा रुग्णालयासह 25 ग्रामीण रुग्णालयांतील 37 डॉक्टरांच्या जागा रिक्त असल्याने आरोग्य विभागाच्या डॉक्टरांवरील कामचा बोजा वाढला आहे. रुग्णांची सेवा करण्यापेक्षा कामाचा निपटारा करण्याच्या नादात सिव्हिलसह ग्रामीण रुग्णालयांत रुग्णांची हेळसांड होत आहे. जिल्हा रुग्णालयात 10 डॉक्टरांची पदे रिक्त आहेत.
    सरकारी रुग्णालयांत तपासणीसाठी चांगली वैद्यकीय उपकरणे व औषधोपचार असतानाही सेवेला रुग्णांचा प्रतिसाद यथातथाच मिळतो. रुग्णालयांत डॉक्टर वेळेवर न मिळणे, नर्सेसचे किंचाळणे आदी कारणांमुळे ‘फुकटचा वैताग’ करून घेण्यापेक्षा पैसे देऊन खाजगी डॉक्टरांचा उपचार करून घेण्याकडेच नागरिकांचा कल दिसतो. रुग्णांच्या अशा तक्रारींचा विचार करुन ‘दिव्य मराठी’ने आढावा घेतला असता येथील डॉक्टरांच्या समस्याही समोर आल्या.
    डॉक्टरांना ‘नावे’ ठेवतानाच त्यांच्या कामात येणाºया समस्यांकडेही लक्ष द्या, असे खाजगीत डॉक्टरांनी म्हटले. त्यानुसार सिव्हिल सर्र्र्र्र्जन कार्यालयातील माहितीनुसार रिक्त पदांची आकडेवारी समोर आली. येथील डॉक्टरांवरील कामाचा ताणही त्यामुळे स्पष्ट झाला आहे.डॉक्टरांवरील राग व्यक्त करतानाच त्यांच्या रूटीन वर्कमध्ये येणाºया समस्यांचाही विचार रूग्णांसह संघटनांनी करण्याची गरज आहे.

Trending