आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा रुग्णालय परिसर स्वच्छ करून "केरळ दिन' साजरा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्हा रुग्णालयाचा परिसर स्वच्छ करून केरळी बांधवांनी शनिवारी केरळ दिन साजरा केला. अनेकजण सहकुटुंब या मोहिमेत सहभागी झाले होते.
1 नोव्हेंबर हा दिवस केरळ राज्याचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. नगर शहरात अनेक केरळी कुटुंबे स्थायिक झाली आहेत. विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम ते साजरे करत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक स्वच्छतेच्या आवाहनाला प्रतिसाद देत केरळी बांधवांनी शनिवारी जिल्हा रुग्णालयाचा परिसर स्वच्छ करून आदर्श घालून दिला. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे आरएमओ बापूसाहेब गाडे, व्ही. पी. सुदर्शन, ए. एस. कुरियन, राज लक्ष्मण, पी. सत्यन, तसेच एमआयडीसी, एमआयआरसी येथील केरळी नागरिक उपस्थित होते. नगरकरांनी स्वच्छतेचे महत्त्व जाणून घेऊन शहर स्वच्छ ठेवले, तर डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांचे प्रमाण कमी होईल, असे गाडे यावेळी म्हणाले.