आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवळाली प्रवरा येथील स्वच्छता पॅटर्न जिल्हाभर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर शहराबरोबरच जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रातील स्वच्छतेसाठी जिल्हा प्रशासन आता त्या-त्या भागातील लोकप्रतिनिधी, नागरिक सामाजिक संस्थांची मदत घेऊन स्वच्छता आराखडा तयार करणार आहे. स्वच्छतेबाबत देवळाली प्रवरा नगरपालिकेचे काम उत्कृष्ट असल्याने तेथील पॅटर्न आता जिल्हाभर राबवण्याचा विचार प्रशासन स्तरावर सुरू आहे.

स्वच्छतेबाबत जनजागृतीचा अभाव असल्याने शहरी भागात दिवसेंदिवस प्रदूषण वाढत चालले आहे. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासकीय स्तरावर विविध उपाययोजना राबवण्यात येतात. मात्र, नागरिक त्या भागातील लोकप्रतिनिधींच्या वेळकाढूपणामुळे त्या फोल ठरतात.शहरी भागात प्रदूषण वाढण्याचे मुख्य कारण प्लास्टिकच्या पिशव्या आहेत. या पिशव्यांवर राज्याच्या पर्यावरण विभागाने बंदी घातली असली, तरी त्यांची विक्री वापर सर्रास केला जातो. शहरी भागात आजही उघड्यावर गटारी आहेत. तीच परिस्थिती नगरपालिका असलेल्या शहरांत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत अनेकांनी हातात झाडू घेऊन फोटो काढण्यापुरती स्वच्छता केली. मात्र, गेल्या काही दिवसापांसून ही मोहीमही बारगळली आहे. काही शासकीय कार्यालयांमध्ये मात्र आठवड्यातून एकदा सर्व कर्मचारी स्वच्छता मोहीम राबवतात.
केंद्र राज्य सरकारने शहरी भागातील स्वच्छतेसाठी विशेष उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यासाठी निधीची तरतूददेखील केली आहे. स्वच्छ, हरित सुंदर शहर घडवण्यासाठी राज्य सरकारने स्वच्छ महाराष्ट्र अभियान सप्तपदी तयार केली आहे. त्याअंतर्गत शहरी भागातील स्वच्छतेसाठी सहभागाचा ठाम निर्धार, १०० टक्के शौचालय वापर, कचंचे संकलन, वाहतूक वर्गीकरण, कचवर शास्त्रोक्त प्रक्रिया, सांडपाण्यावर प्रक्रिया स्वच्छ, हरित सुंदर शहर यावर भर देण्यात येणार आहे. महापालिका नगरपालिका क्षेत्रात प्रशासन आता त्या प्रभागातील, वॉर्डातील नागरिक, लोकप्रतिनिधी सामाजिक संस्थांची मदत घेऊन स्वच्छता आराखडा तयार करणार आहे.

देवळाली प्रवरा नगरपालिकेने स्वच्छतेसाठी प्रत्येक प्रभागात कचरा टाकण्यासाठी प्रकल्प सुरू केले आहेत. स्वच्छतेबाबत ही नगरपालिका जिल्ह्यात आदर्श असून िजल्ह्यातील सर्व महापालिका नगरपालिका क्षेत्रात देवळाली प्रवरा पटर्न राबवण्याचा विचार जिल्हा प्रशासन करत आहेत.

जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अजूनही स्वच्छतेकडे फारसे लक्ष दिले जात नाही.
स्वच्छते विषयी प्रबोधन स्वच्छतेबाबत अजूनही नागरिकांमध्ये जागृतीचा अभाव आहे. शहरी भागातील नागरिकांमध्ये १०० टक्के शौचालय वापर, कचचा निचरा, प्लास्टिक बंदीबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे. त्या-त्या भागातील नागरिक, लोकप्रतिनिधी सामाजिक संस्थांना एकत्र आणून त्यांच्याशी विचारविनिमय करुन स्वच्छतेचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.'' अनिलकवडे, जिल्हाधिकारी.
बातम्या आणखी आहेत...