आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात आता सलग चार दिवस राबवली जाणार स्वच्छता मोहीम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - प्रशासनातील अधिकांनी मनावर घेतल्यास सर्व समस्या सुटू शकतात. याचा प्रत्यय पुढील आठवड्यात अकोलेकरांना येणार आहे. एकाच दिवशी एका झोनमध्ये महापालिकेतील सफाई कामगारांसह सर्वच कर्मचांना सफाईसाठी मैदानात उतरवले जाणार आहे. उपायुक्त माधुरी मडावी यांनी स्वच्छतेचा हा आराखडा आखला आहे. सलग चार दिवस स्वच्छता मोहीम राबवून चार दिवसांत शहर स्वच्छ करण्याचे अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या किंवा पुढील आठवड्यात ही मोहीम राबवण्याची शक्यता आहे.

२८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेल्या महापालिका क्षेत्राची लोकसंख्या साडेचार लाखांपेक्षा अधिक आहे, तर सफाई कामगारांची संख्या ७४० आहे. लोकसंख्येच्या मानाने सफाई कामगारांची संख्या कमी असल्याने कंत्राटी सफाई कामगारही नियुक्त करण्यात आले आहेत. परंतु, संपूर्ण शहराची सफाई होत नाही. काही मुख्य रस्ते वगळल्यास नियमितपणे रस्त्यांची सफाई होत नाही. त्यामुळे शहराच्या अनेक भागांत कचरा साचल्याचे दिसते. प्लास्टिक पिशव्यांचा अधिक वापर यास कारणीभूत ठरला आहे. ४० मायक्रॉनपेक्षा कमी दर्जाच्या प्लास्टिक पिशव्या वापरण्यास मनाई आहे. परंतु, या पिशव्यांचा सर्रास वापर होतो. विशेष म्हणजे नागरिकही प्लास्टिक पिशव्या घेण्यास नकार देत नाही. त्यामुळेच शहराला बकाल रूप प्राप्त झाले. या सर्व बाबी लक्षात घेऊनच उपायुक्त मडावी यांनी शहरात स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

चार दिवस महापालिकेचे सर्वसामान्य कामकाज कोलमडू नये, ही बाबही प्रशासनाला लक्षात घ्यावी लागणार आहे. त्यामुळे सलग चार दिवस किंवा एक दिवसाआड ही मोहीम राबवावी? यावर अद्याप निर्णय झालेला नाही. या मोहिमेत सफाई कामगारांसह वर्ग-४, वर्ग-३, वर्ग-२ आदी सर्व कर्मचारी सहभागी होणार आहेत. या अभियानामुळे गल्ली अन् गल्ली स्वच्छ होईल, असा प्रशासनाला विश्वास आहे.


व्यापांचाही सहभाग
प्रशासनाच्याया मोहिमेला व्यापारी वर्गाने प्रतिसाद दिला आहे. या अनुषंगाने ३० जूनला व्यापारी आणि प्रशासन यांच्यात बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे या मोहिमेत व्यापारी वर्गही सहभागी होऊ शकतो अथवा त्यांच्याकडून अभियान यशस्वी करण्यासाठी काही मदत मिळू शकेल, असा प्रशासनाला विश्वास आहे.

या अभियानाला प्रारंभ होईल.
सफाई कामगारांसह सर्वच कर्मचारी एकत्र जमतील. एका झोनमध्ये प्रभागानुसार कर्मचांची वाटणी केली जाईल. सायंकाळी पर्यंत हे अभियान राबवण्यात येणार आहे. एखाद्या झोनची संपूर्ण स्वच्छता एका दिवसात पूर्ण झाल्यास दुस दिवशी या झोनमध्ये स्वच्छता अभियान राबवले जाईल. कचरा संकलित करण्यासाठी काही ठिकाणी दोन चाकी कचरा गाडी, तर काही ठिकाणी अॅपे वाहनाचा वापर केला जाईल.

समाजसेवी संघटनांनी सहकार्य करावे
चारदिवस सलग स्वच्छता अभियान राबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या मोहिमेत महापालिकेचे सर्वच कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर व्यापांनीही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनीही या मोहिमेत सहभागी व्हावे. तसेच शहरातील सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन ही स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे.'' माधुरीमडावी, उपायुक्त

बातम्या आणखी आहेत...