आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Clean India, Green India,latest News In Divya Marathi

लष्करी जवानांनी उचलला 26 ट्रॅक्टर कचरा, पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नगरच्या लष्करी जवानांनी शहरात क्लिन इंडिया, ग्रीन इंडिया तर्गत जोरदार स्वच्छता मोहीम राबवली. सुमारे पाचशे जवानांनी विविध भागात सुमारे 26 ट्रॅक्टर कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावली.
नगर शहराजवळ आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कूलचे (एसीसीएस) मुख्यालय आहे. एसीसीएसच्या विभागांनी कमांडंट अशोक मेहता यांच्या अधिपत्याखालील ही मोहीम राबवली. लष्करात वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेला अतिशय महत्त्व दिले जाते. किंबहुना लष्करात भरती झाल्यानंतर पहिला धडा स्वच्छतेचाच दिला जातो. त्यामुळे लष्कराच्या विभागांनी पंतप्रधानांचे आवाहन अतिशय गांभीर्याने घेऊन त्याला प्रतिसाद दिला. गुरुवारी सकाळी सर्वप्रथम एसीसीएसच्या सर्व रँकच्या अधि कारी व जवानांनी स्वच्छतेची शपथ घेतली. त्यानंतर अधिकारी, जवान, त्यांच्या कुटुंबीयांनी कॅन्टोन्मेंट परिसर, आर्मी पब्लिक स्कूल, लष्करी संस्था, जवानांची निवासस्थाने, तसेच कॅटोन्मेंट परिसरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग परिसरात स्वच्छता केली. सुमारे तीनशे जवानांनी तारकपूर बसस्थानक, गुलमोहोर रस्ता, नगर-औरंगाबाद राज्य महामार्ग, तसेच एकवीरा चौकात स्वच्छता मोहीम राबवली. त्यांना कर्नल रणजीव सिंह, मेजर संदेश कुमार यांनी मार्गदर्शन केले. दिवसभर जवानांनी अतिशय शिस्तीत शहराच्या विविध भागात ही स्वच्छचा मोहीम राबवली. विघटनशील व अविघटनशील कचरा गोळा करून त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावण्यात आली. वाढलेले गवत व झुडपे काढण्यात आली. जवानांच्या मोहिमेत आनंद विद्यालय व ना. ज. पाऊलबुधे विद्यालयाचे विद्यार्थीही सहभागी झाले होते.

तारकपूर स्थानकात सहा ट्रॉली कचरा
लष्करातील जवानांनी काम करण्यासाठी नगर शहरातील महत्त्वाचे म्हणजे तारकपूर एसटी बसस्थानक निवडले. तेथे त्यांनी सहा ट्रॅक्टरच्या ट्रॉली भरून कचरा जमा करून उचलला, यावरून त्यांच्या कामासाठी हे स्थळ किती 'आदर्श' होते, हेही सिद्ध झाले. बसस्थानकात अक्षरश: प्लािस्टकच्या पिशव्या व पाण्याच्या बाटल्यांचा खच साचला होता. कित्येक दिवस झाडूही मारला जात होता की नाही, अशी स्थिती तेथे होती. अस्ताव्यस्त झुडूपे वाढली होती. ती जवानांनी तोडून साफ केली. त्यामुळे डासांच्या त्रासाबरोबरच परिसरातील दुर्गंधीही बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे. तारकपूर बसस्थानक परिसरात बाजूचे हॉटेल व्यावसायिक जे उरलेले अन्न फेकतात, त्यांना प्रतिबंध घालण्याची गरज लष्करी जवानांनी यावेळी व्यक्त केली.