आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यातील १८ लाख कुटुंबांशी संवाद, स्वच्छ भारत मिशनचे गृहभेट अभियान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राज्यात अजूनही १८ लाख कुटुंबांकडे शौचालये नाहीत. अशा कुटुंबांनी तत्काळ शौचालये बांधावीत, यासाठी स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत २२ ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत गृहभेटीची मोहीम राबवण्यात येईल.
वार्षिक कृती आराखड्यात १८ लाख कुटुंबांना भेटी देण्याचे नियोजन आहे. पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री, तसेच प्रधान सचिव हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधून अभियानाची माहिती देणार आहेत. जि. प. अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागप्रमुख, गटविकास अधिकारी, स्वच्छता कक्ष यांची बैठक घेऊन अभियानाच्या यशस्विततेसाठी प्रयत्न करतील.

१० ते १६ ऑगस्ट या कालावधीत गावोगावी कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. गावपातळीवर संवादक म्हणून काम करणाऱ्या विविध घटकांसाठी तालुकास्तरीय उदबोधनाचे आयोजन करून त्यात गृहभेटीचे स्वरूप, पद्धती, चर्चेचे विषय कुटुंब भेटीचे नियोजन याबाबतही माहिती दिली जाणार आहे. सोमवारपासून या अभियानाला सुरुवात होईल.

शौचालय नसलेल्या ५० कुटुंबासाठी गट संवादक नेमण्यात येणार आहेत. या उपक्रमाचे नियोजन पाणी स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उज्वला बावके करणार आहेत. २८ सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत शौचालय बांधणाऱ्या कुटुंबांना अनुदान वितरीत करण्याचा िनर्णय घेण्यात येणार आहे. उघड्यावर शाैचाला जाणाऱ्या व्यक्तीवर मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार प्रतीव्यक्ती प्रतिदिन ५० पैसे याप्रमाणे दंड आकारला जाईल. दंडात्मक वसुलीही करण्यात येईल. त्यामुळे तत्काळ शौचालये बांधावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
बातम्या आणखी आहेत...